Beed news
केवायसीसाठी लाडक्या बहिणींची बँकेकडून अडवणूकpudhari photo

आष्टी : केवायसीसाठी लाडक्या बहिणींची बँकेकडून अडवणूक

केवायसीसाठी लाडक्या बहिणींची बँकेकडून अडवणूक; बँक ऑफ महाराष्ट्रच्या कारभाराला ग्राहक वैतागले
Published on

आष्टी, पुढारी वृत्तसेवा: परतूर तालुक्यातील आष्टी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या कारभाराला ग्राहक वैतागले आहेत. बँकेत लाडक्या बहिणींना अनुदानासाठी तीन तीन तास उभे राहील्यानंतर खाते केवायसीसाठी तब्बल दोन ते अडीच महिने वाट पहावी लागत आहे. ऐन सनासूदीच्या काळात खात्यावरील पैसे काढता येत नसल्याने लाडक्या बहीणींमधे प्रचंड रोष व्यक्त होत आहे.

आष्टी येथे बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा असून परिसरातील जवळपास २० ते २२ गावे या बँकेने दत्तक घेतले आहेत. त्यामुळे बँकेच्या खातेदारांची संख्या अधिक आहे. विशेष करून महिलांचे मोठ्या संख्येने या बँकेत खाती आहेत.

मात्र गेल्या काही दिवसांपूर बँकेचे अधिकारी व कर्मचरी मनमानी कारभार असल्याचा आरोप मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहीणी करीत आहेत. शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानसह पीएम किसान योजनेचे पैसे खात्यात जमा होत असल्यामुळे अनेक खात्याची केवायसी केल्याशिवाय लाभार्थ्यांना अनुदान मिळत नाही. गेल्या काही दिवसांपासून केवायसी करण्यासाठी बँकेत लाडक्या बहिणींसह शेतकऱ्यांची गर्दी होत असून केवायसी करण्यासाठी बँकेचे अधिकारी एक महिन्याच्या नंतर या असे सांगत आहेत. मात्र अनेकदा महिना ऊलटुनही केवायसी होत नाही.

Beed news
लाडक्या बहिणींची ससेहोलपट थांबेना

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news