

Conservation of indigenous cows through modern management
शिवनाथ जाधव
टाकरवन : एकीकडे वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे गोवंश संकटात सापडला असताना, दुसरीकडे टाकरवन (जि. बीड) येथील गोशाळेने मात्र गोसेवेचा एक अनोखा आणि प्रेरणादायी ध्यास घेतला आहे. उत्तम नियोजन, सुसज्ज व्यवस्थापन आणि वैद्यकीय निगा यांच्या जोरावर ही गोशाळा संपूर्ण जिल्ह्यासाठी एक नवा आदर्श ठरत आहे.
आजच्या आधुनिक काळात गोशाळा केवळ गाईच्या संगोपनाचे केंद्र न राहता गो संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या प्रमुख आधारस्तंभ ठरत आहे. गोशाळेच्या माध्यमातून देशी गायीच्या प्रजातीचे रक्षण सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन आणि पंचगव्य आधारित उत्पादनाची निर्मिती यासारख्या उपक्रमासाठी मोठी गती मिळत आहे. त्या अनुषंगानेच टाकरवन या ठिकाणी बाबा मा गोशाळा सुरू केले आहे.
गायींना राहण्यासाठी अत्यंत मोकळी, सुरक्षित आणि आधुनिक पद्धतीची सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे. ऊन, वारा आणि पावसापासून बचाव व्हावा यासाठी योग्य शेड आणि सुरक्षित व्यवस्थापन करण्यात आले आहे. गायींच्या आरोग्यासाठी दररोज ताज्या, हिरव्या व वाळलेल्या योग्य चाऱ्याची नियमित सोय केली जाते. भारल्याबद्दल आमचे स्नेही श्री. रुपेश वैष्णव यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
ही गोशाळा या परिसरातील चर्चेची बनली असून, त्यामुळे सांस्कृतिक व सामाजिक ओळख झाली आहे. या गोशाळेसाठी काम कणाऱ्यांचे कौतूक होत आहे.
गोसेवेचा ध्यास
केवळ निवारा न देता, पूर्ण श्रद्धेने आणि समर्पणाने गायींची सेवा केली जात आहे. गोसेवेचा नवा संदेशः आजच्या काळात जिथे गोवंशाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसते, तिथे टाकरवनच्या या उपक्रमाने समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक कामाचा वस्तूपाठ घालून दिला आहे. स्थानिक नागरिक आणि गोप्रेमींकडून या आदर्श गोशाळेचे मोठे कौतुक होत आहे. डॉक्टरांकडून गायींची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. लसीकरण, आजारपणावरील उपचार आणि विशेष निगा राखण्यासाठी खास टीम कार्यरत आहे. नामशेष होत चाललेल्या देशी गोवंशाचे रक्षण करणे, त्यांचे जतन करणे आणि संख्या वाढवणे हा या गोशाळेचा मुख्य उद्देश आहे