Beed news: गेवराईत १५ ब्रास वाळू, ट्रकसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघे ताब्यात

या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे
Beed news: गेवराईत १५ ब्रास वाळू, ट्रकसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघे ताब्यात
Published on
Updated on

गेवराई : बीड जिल्ह्यात नदीपात्रातील वाळू उपसा व वाहतूक सुरू असून, याकडे स्थानिक पातळीवर दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, गेवराई परिसरात अवैध वाळू वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत अशोक लेलँड कंपनीचा ट्रक व त्यातील अंदाजे १५ ब्रास वाळू असा एकूण ३५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी पहाटे धुळे-सोलापूर महामार्गावरील हॉटेल डिसेंटसमोर करण्यात आली.

Beed news: गेवराईत १५ ब्रास वाळू, ट्रकसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघे ताब्यात
Beed News : दगडफेकप्रकरणी वडवणी शहर कडकडीत बंद

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे यांच्या पथकाने गेवराई परिसरात अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग सुरू केले होते. यावेळी धुळे-सोलापूर महामार्गावरील हॉटेल डिसेंटसमोर एक ट्रक विनापरवाना वाळू भरून वाहतूक करत असल्याची माहिती पथकाला मिळाली.

Beed news: गेवराईत १५ ब्रास वाळू, ट्रकसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघे ताब्यात
Beed News : आरोपीच्या अटकेसाठी आठ दिवसांचा अल्टीमेटम

या माहितीच्या आधारे पथकाने पंचांसमक्ष पहाटे सुमारे २.३० वाजता कारवाई करून एमएच-२६-बीई-०११५ क्रमांकाचा केशरी रंगाचा अशोक लेलँड ट्रक ताब्यात घेतला. ट्रकमध्ये अंदाजे १५ ब्रास वाळू आढळून आली. वाळू वाहतुकीसाठी आवश्यक परवाना अथवा पास नसल्याचे वाहनातील इसमांनी सांगितले.

Beed news: गेवराईत १५ ब्रास वाळू, ट्रकसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघे ताब्यात
Beed News : आरोपीच्या अटकेसाठी आठ दिवसांचा अल्टीमेटम

या कारवाईत जितेंद्र राजेंद्र नेमाणे (वय २३) आणि गणेश राजेंद्र नेमाणे (वय २४), दोघे रा. नारायणगाव (ता. अंबड, जि. जालना) यांना ताब्यात घेण्यात आले. ट्रक व वाळू असा एकूण ३५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५०३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ३०३(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Beed news: गेवराईत १५ ब्रास वाळू, ट्रकसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघे ताब्यात
Beed Theft News : घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख व उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे, पोलीस अंमलदार मनोज परजणे, बबन सलगर व अश्पाक सय्यद यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news