Harshvardhan Sapkal : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हातावर सरकारने तुरी दिल्या

बीडच्या बैठकीत सपकाळ यांचे प्रतिपादन
Harshvardhan Sapkal
Harshvardhan Sapkal : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हातावर सरकारने तुरी दिल्याfile photo
Published on: 
Updated on: 

Congress state president Harshvardhan Sapkal criticizes the government

बीड, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलेली पाच हजार रुपयांची मदत म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. सरकारने मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्या आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी; अन्यथा जिल्ह्या-जिल्ह्यात मोर्चे काढून सरकारला मदत देण्यास भाग पाडू, असा इशारा त्यांनी दिला.

Harshvardhan Sapkal
Nanded Crime | वास्तुशांतीनंतर घरातील देव्हारा फेकल्यावरून वाद; विळ्याने गळा, डोके, मानेवर वार करून महिलेचा खून

बीड येथे काँग्रेसच्या विभागीय बैठकीसाठी आले असता सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांना मिळणारी तुटपुंजी मदत, जनावरांसाठी चारा छावण्यांचा अभाव आणि सरकारच्या कारभारावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. पाच हजार रुपयांची मदत जाहीर करून सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा केली असून ही मदतही सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारची खिल्ली उडवली. चारा छावण्या सुरू व्हायला हव्या होत्या; मात्र सरकारला मुक्या जनावरांच्या वेदनाही समजत नाहीत, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसने नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या असून गावपातळीपर्यंत संघटन बांधणी करण्यावर भर दिला जाणार आहे. पक्षाने ३६६ प्रभारींची नियुक्ती केली आहे. शेतकरी आणि अन्य जनतेच्या प्रश्नांवर आगामी काळात आंदोलने अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. याशिवाय कुंभमेळ्यातील ३६ हजार कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचारावरून आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले. सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राचा मुद्दा, सावरकरांच्या माफीनाम्यांचा मुद्दा, अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी आणि राष्ट्रवादीच्या अर्थखात्याबाबत त्यांनी विविध गंभीर प्रश्न उपस्थित केले.

Harshvardhan Sapkal
Nanded News : रोहित पवारांच्या स्टंटबाजीवर खा. अशोक चव्हाणांचा टोला

मंत्र्यांनो रस्त्यावर फिरू देणार नाही

दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आणि पशुधनाला वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारचा तीव्र शब्दांत धिक्कार करत हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकार मुके, बहिरे आणि आंधळे झाले असून या जनक्षोभामुळे आगामी काळात मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा आक्रमक इशारा त्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.