

Conduct structural audit of iron bridge on Bindusara dam: mla Kshirsagar
बीड, पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील कुंडमळा धरणा-वरील लोखंडी पूल तुटून झालेल्या अपघातात चार जणांचा बुडून मृत्यू झाला तर २५ जन वाहून गेले होते, या घटनेचे गांभीर्य घेऊन बीडचे आ. संदीप क्षीरसागर यांनी बिंदुसरा धरणावरील लोखंडी पुला बाबत संबंधित विभाग तसेच पोलिसांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या असून या लोखंडी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या त्यांनी सूचना केल्या.
याबरोबरच उ परिसरात सध्या पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देत असून काही हौशी तर त्या पुलावर जावून उद्या मारत आहे. त्यामुळे पोलिसांनी हे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून त्या ठिकाणी बंदोबस्त द्यावा अशा सूचना केल्या.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा धरणा-वरील लोखंडी पूल तुटून झालेल्या अपघात नंतर बीड जिल्ह्यात अशाच पद्धतीने कुठे कुठे अपघात होतील या भीतीने आ. संदीप क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदार संघातील धरणे, तलाव या बाबतची आढावा बैठक घेऊन या बैठकीत ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे जुने लोखंडी पूल आहेत त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या तसेच बीड ग्रामीण पोलिसांनादेखील त्यांच्या हद्दीतील धरणे, तलाव या ठिकाणी अशा धोकादायक पुलावर जाण्यापासून पर्यटकांना प्रतिबंध घालावा, त्याठिकाणी पोलिसांची ड्युटी लावावी अशा सूचना त्यांनी या बैठकीत केल्या.
दरम्यान पाटबंधारे विभागाने बिंदुसरा धरणावरील लोखंडी पूल हा निजामकालीन असून तो कमकुवत झाला असून त्याला खालून आधार दिला आहे. मात्र पर्यटकांनी त्याठिकाणी जर खूपच गर्दी केली तर निश्चित दुर्घटन होण्याची शक्यता असून त्या बाबत आपण जिल्हाधिकारी तसेच पोलिसांना पत्र व्यवहार केला असल्याचे बैठकीत सांगितले. निजामकालीन पूल असल्याने हा पूल तेवढा सक्षम राहिला नाही, त्यामुळे त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रस्ताव दाखल करावा असे यावेळी अ.क्षीरसागर यांनी विभागाला सूचना केल्या.
बीड येथील बिंदुसरा धरणावरील लोखंडी पूल हा निजामकालीन असून तो १९५१ सालचा आहे. त्यामुळे तो आता ७४ वर्षाचा जुना पूल आहे. हा पूल मोठी गर्दी सहन करणारा नाही शिवाय या पुलाच्या खालून पाणी अत्यंत वेगाने प्रवाहित होत असल्याने धोक्याची शक्यता जास्त असून पर्यटकांनी या पुलावर जाऊ नये, असे आवाहन अ. संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.