

बीड : येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये एका फिर्यादीने विष पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दत्ता जबडे ( रा. पुणे ) असे विष पिलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पत्नी व तिच्या प्रियकराकडून मारहाण तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार जबडे यांनी दिली होती. त्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. यादरम्यानच त्यांनी आता विष प्राशन केले. दत्ता जबडे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.