Accident: "आजोबा, मला कपडे घ्या ना..." श्रेयाचा हट्ट अपुराच राहिला; कापूस विकून परतताना भीषण अपघात, दोन भावांसह नातीचा मृत्यू

दिवाळीच्या पूर्वसंध्येला शनिवारी हृदयद्रावक घटना घडली. आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील पडोळे कुटुंबातील तिघांचा मिरजगावजवळील बाभळगाव येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला.
Kelasangavi Beed accident news
Kelasangavi Beed accident newsfile photo
Published on: 
Updated on: 

Beed Accident

कडा : दिवाळीच्या पूर्वसंध्येला आनंदाच्या क्षणांवर दुःखाचे सावट पसरवणारी हृदयद्रावक घटना शनिवारी घडली. आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील पडोळे कुटुंबातील तिघांचा मिरजगावजवळील बाभळगाव येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. सुदाम मारुती पडोळे (वय ५५), देविदास मारुती पडोळे (वय ५५) आणि श्रेया विशाल पडोळे (वय १०) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे केळसांगवी गावासह संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केळसांगवी येथील पडोळे कुटुंबातील सदस्य कापूस विक्रीसाठी मिरजगावजवळील बाभळगाव येथील जिनिंगवर गेले होते. कापूस जिनिंगवर टाकून शनिवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या दरम्यान ते मोटारसायकलवरून घरी परतत होते. याचवेळी मोटारसायकल आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. धडक एवढी जोरात होती की कारने मोटरसायकलला तब्बल ३०० फूट पर्यंत फरफटत नेले. या अपघातात तिघांना गंभीर दुखापत झाली. उपचार मिळण्यापूर्वीच या दुर्दैवी घटनेत तिघांचाही मृत्यू झाला.

Kelasangavi Beed accident news
Sangli Accident : कुपवाडमध्ये वाहनाच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

दिवाळीचा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना पडोळे कुटुंबावर काळाने घाला घातला. सणासाठी घरी परतणाऱ्या कुटुंबीयांवर नियतीने असा आघात केल्याने गावकऱ्यांचेही मन सुन्न झाले आहे. घरात दिवाळीची तयारी आणि सणाचा उत्साह असण्याऐवजी आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अपघातानंतर मृतदेहांचे शवविच्छेदन मिरजगाव येथे करण्यात आले. या भीषण अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत. दिवाळीच्या मंगलमय पर्ваवर एका कुटुंबातील तिघांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने केळसांगवी गावावर शोककळा पसरली आहे. आनंदाचा सण एका क्षणात दुःखात बदलल्याने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

"आजोबा, मला दिवाळीला नवे कपडे पाहिजेत"

नुकत्याच बापाचे छत्र हरवून बसलेल्या श्रेयाने "आजोबा, मला दिवाळीला नवे कपडे घ्या ना... नवे कपडे आणि फटाके मला पाहिजेत," असा हट्ट धरला होता. आजोबा शेतातील कापूस विकून येणाऱ्या पैशातून तिला नवे कपडे घेणार होते. मात्र नियतीला हे मान्य नव्हते. एका क्षणात या चिमुरडीचा जीव गेल्याने संपूर्ण पंचक्रोशीतुन हळहळ व्यक्त होत आहे.

Kelasangavi Beed accident news
Sangli Accident : ताकारीजवळ अपघातात विवाहितेचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.