Sangli Accident : कुपवाडमध्ये वाहनाच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

कुपवाड ते माधवनगर रस्त्यालगत असलेल्या आर. पी. पाटील शाळेजवळील ओढ्यावरील रस्त्यावर अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक
Accident
AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

कुपवाड : कुपवाड ते माधवनगर रस्त्यालगत असलेल्या आर. पी. पाटील शाळेजवळील ओढ्यावरील रस्त्यावर अज्ञात वाहनाने सायकलला जोरदार धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सायकलस्वाराचा मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजू बाबुराव मोकाशी (वय ५५, रा. गल्ली नंबर आठ, कुंभार खण, मिरज) असे मृताचे नाव आहे.

राजू मोकाशी हे शनिवारी सायंकाळी सायकलवरून चालले होते. त्यावेळी वेगाने आलेल्या अज्ञात वाहनावरील चालकाने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत मोकाशी रस्त्यावर कोसळले. त्यांच्या डोक्याला व शरीरावर गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पसार झाला.

अपघाताची माहिती मिळताच 'आयुष हेल्पलाईन' टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमी मोकाशी यांना उपचारार्थ मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.