Beed News : बीडमध्ये लग्न समारंभात तोफेचा स्फोट, दोन छायाचित्रकार गंभीर जखमी

एकाची प्रकृती चिंताजनक, छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू
Beed Crime News
Beed News : बीडमध्ये लग्न समारंभात तोफेचा स्फोट, दोन छायाचित्रकार गंभीर जखमीfile photo
Published on
Updated on

Cannon Explodes at Wedding Ceremony in Beed

बीड, पुढारी वृत्तसेवा बार्शी रोडवरील एका मंगल कार्यालयात सुरू असलेल्या विवाह सोहळ्यात मंगळवारी (दि. २८) रात्री भीषण दुर्घटना घडली. फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करत असताना अचानक अवैध दारुगोळ्याची तोफ फुटल्याने दोन तरुण छायाचित्रकार गंभीर जखमी झाले. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.

Beed Crime News
Beed district hospital : माता, बाल रुग्णालय महिनाभरात कार्यान्वित होणार

बार्शी रोडवरील एका मंगल कार्यालयात विवाह सोहळा आयोजीत करण्यात आला होता. या सोहळ्याचे चित्रीकरण करण्यासाठी आलेले छायाचित्रकार अभिषेक गोरख कदम (वय २४) आणि त्यांचा सहकारी क्षितिज शेटे (वय २५) हे आपले काम करत होते. याच वेळी स्वागत समारंभासाठी वापरण्यात येणारी दारुगोळ्याची तोफ अचानक फुटली आणि या दोघांच्या अंगावर आदळली.

या स्फोटामुळे अभिषेक कदम याच्या चेहऱ्याला गंभीर मार लागला असून तो भाजला गेला आहे. तर क्षितिज शेटे याच्या कानाला मोठी दुखापत झाली आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. दोघांनाही तातडीने बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Beed Crime News
Sambhajinagar News : मेव्हण्याचा पाण्यात बुडून मृत्यू; साल्याने जीवन संपवले

मात्र, अभिषेकची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. क्षितिज शेटे याच्यावर बीडमध्येच उपचार सुरू आहेत.

अवैध तोफांचा प्रश्न ऐरणीवर

लग्नसमारंभात अशा प्रकारे घातक आणि अवैध दारुगोळ्याचा वापर करणे किती धोकादायक ठरू शकते, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारच्या प्रकरणांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असून, विनापरवाना स्फोटकांचा वापर थांबवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news