चुलीतल्या कोलीताने सासऱ्याने जावयाला बदडला, पुन्हा सासू, मेव्हणा अन् बायकोने सुद्धा तुडवला!

केज पोलिस ठाण्यात या घटनेवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
beed cage crime news
चुलीतल्या कोलीताने सासऱ्याने जावयाला बदडला, पुन्हा सासू, मेव्हणा अन् बायकोने सुद्धा तुडवला!file photo
Published on
Updated on

cage beed Son-in-law assaulted by father-in-law, mother-in-law, and wife

केज : गौतम बचुटे पती-पत्नीच्या किरकोळ वादातून शेजारी राहणाऱ्या सासऱ्याने जावयाला चुलीतल्या पेटलेल्या कोलीताने मारहाण केली. त्‍यातच पुन्हा त्या जावयाला त्याच्या सासू, मेव्हणा आणि बायकोने सुद्धा काठीने मारहाण करून जखमी करून लाथा बुक्क्यांनी तुडविल्याची घटना समोर आली आहे.

beed cage crime news
बलात्काराची तक्रार देण्यास गेलेल्या पीडितेच्या पतीला पोलिसाची मारहाण ?

केज येथील बीड रोड जवळ असलेल्या आश्रम शाळेच्या जवळ एकनाथ उत्तम सावंत हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सुरेशनगर येथील डवरी गोसावी जातीचे भटके कुटुंब राहत आहे. एकनाथ सावंत यांच्या झोपडी शेजारीच झोपडी करून त्याचे सासरे भीमराव तात्याराव शिंदे यांचे कुटुंब राहत आहे.

एकनाथ सावंत हा त्याचे सासरे भीमराव शिंदे यांचा पीक-अप चालवित असल्याने त्याने दि. १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नीला तिच्या वडिलांकडे कामाचे पैसे मागून घे. असे म्हणाला. असे म्हणण्याने त्यांच्यात किरकोळ भांडण झाले होते.

beed cage crime news
Kolhapur crime news | सीपीआर चौकातून पळाला अन् बारमध्ये पिताना सापडला!

त्यांचे भांडण कानावर पडताच भीमराव शिंदे याने जावई एकनाथ सावंत याला काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच चुलीतल्या जळत्या कोळीताने मारून जखमी केले. तसेच सासू मीराबाई शिंदे, मेव्हणा विजय शिंदे आणि बायको मनिषा यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी चांगलाच तुडवला. त्या नंतर एकनाथ त्यांच्या तावडीतून निसटून गावाकडे पळून गेला आणि त्याला झालेल्या मारहाणीची माहिती त्याच्या आईला दिली.

दि.१९ एप्रिल केज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून सासरा भीमराव शिंदे, सासू मीराबाई शिंदे, मेव्हणा विजय शिंदे आणि पत्नी मनिषा सावंत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल निर्मला जाधव या तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news