Dharur News : कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर बुलडोझर

धारूर शहरातील वाढत्या ध्वनीप्रदूषणावर आळा घालण्यासाठी आणि नियमबाह्य वाहतूक रोखण्यासाठी धारूर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत कडक कारवाई केली.
Dharur Traffic Police News
Dharur Traffic Police NewsPudhari
Published on
Updated on

Bulldozer on the Silencers of Roaring Bullet Bikes

धारूर, पुढारी वृत्तसेवा धारूर शहरातील वाढत्या ध्वनीप्रदूषणावर आळा घालण्यासाठी आणि नियमबाह्य वाहतूक रोखण्यासाठी धारूर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत कडक कारवाई केली. या मोहिमेत बिना नंबर प्लेट, बिना वैध परवाना तसेच कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट चालकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. एकूण ३२ दुचाकींवर कारवाई करत सुमारे १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Dharur Traffic Police News
Beed Crime News : महामार्गावर लूटमार करणाऱ्या टोळीवर मिनी मकोका

या कारवाईचे विशेष आकर्षण म्हणजे कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट मोटारसायकलीची सायलेंसर जप्त करून त्यावर बुलडोझर चालवत नष्ट करण्यात आले. या प्रतीकात्मक कारवाईतून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला. ही मोहीम बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Dharur Traffic Police News
Nanded Crime : देहविक्री रॅकेटचा मोठा भांडाफोड; ट्रॅव्हल्स–लॉज कनेक्शनचा संशय गडद

धारूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेव भवर, पोलीस अंमलदार जमीर शेख, शिवाजी सानप, रेवणनाथ दुधाने, संजयकुमार राठोड, अमर घुले, नाना निगुळे, अशोक कदम तसेच होमगार्ड जवान मोठ्या संख्येने सहभागी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news