परळी तालुक्यातील नंदनज- कासारवाडीचा 'बोरणा' तलाव १०० टक्के भरला

बोरणा तलावाच्या सांडव्यावरुन पाणी प्रवाहित
Borana Lake Overflow
बोरणा तलावाच्या सांडव्यावरुन पाणी प्रवाहित Pudhari File Photo
Published on
Updated on

परळी तालुक्यातील नंदनज- कासारवाडी येथील 'बोरणा' मध्यम प्रकल्प  १०० टक्के  भरला आहे. तालुक्यातील जलसाठे भरत असल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सध्यस्थितीत पाण्याचा मोठा ओघ सुरू आहे.  परळी तालुक्यात यंदा चांगला पाऊस  झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी साठवण होण्यासाठी मोठी मदत होत आहे. परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत नागापूर येथील  'वाण प्रकल्प' पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. तालुक्यातील बोधेगाव, करेवाडी, चांदापुर, कन्हेरवाडी, गुट्टेवाडी, मोहा, मालेवाडी, गोपाळपुर, खोडवा सावरगाव, दैठणाघाट, करेवाडी आदींमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण होण्यास सुरुवात झाली आहे. 

Borana Lake Overflow
Pune Rain News | कडूस गावाला वरदान ठरलेला पाझर तलाव भरला

दरम्यान परळी पासून जवळच असलेल्या नंदनज-कासारवाडी येथील बोरणा तलावात 100 टक्के  पाणीसाठा झाला  आहे.मध्यम प्रकल्प असलेल्या बोरणा प्रकल्पाची प्रकल्पिय पाणीसाठा क्षमता 10. 814 द. ल. घ. मी. एवढी आहे. मृतसाठा 1.842 द. ल. घ. मी. इतका असून सद्यस्थितीत बोरणा प्रकल्पात सांडव्यावरुन पाणी प्रवाहित झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news