

परळी- परळी तालुक्यातील दादाहरी वाडगाव येथील २० वर्षीय युवकाने मेरुगिरी डोंगर परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. २८) सकाळी उघडकीस आली. दोन दिवसांपूर्वी त्याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवर घरात घुसून विळ्याने हल्ला केल्याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल झाला होता. या घटनेनंतर तो फरार होता.
मृत युवकाची ओळख आकाश राम खाटीक (वय २०, रा. दादाहरी वाडगाव) अशी झाली आहे. त्याचा मृतदेह परळीतील मेरुगिरी डोंगरावरील आयटीआय महाविद्यालय परिसरात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
यापूर्वी दादाहरी वाडगाव येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून विळ्याने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर तो फरार होता. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्याने आत्महत्या केल्याने या संपूर्ण प्रकरणाची परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
भावनिक एकाकीपणा मुळे टोकाचा निर्णय
"अलीकडच्या काळात युवकांमध्ये तणाव, भीती, अपराधीपणाची भावना, सामाजिक दबाव आणि भावनिक एकाकीपणामुळे टोकाचे निर्णय घेण्याचे प्रमाण वाढताना दिसते. कोणतीही गंभीर घटना घडल्यानंतर संबंधित व्यक्तीला समुपदेशन, मानसिक आधार आणि कुटुंबाचा संवाद मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते.
दुर्दैवाने अलीकडच्या काळात विभक्त कुटुंब पद्धती मुळे ही होताना दिसत नाही. त्यामुळे आशा पद्धतीने टोकाचे पावले अलीकडच्या काळात तरुण पिढी कडून उंचळले जात आहे. समाजानेही अशा व्यक्तींना दोषी ठरविण्यापेक्षा आवश्यक मानसिक मदत मिळेल यासाठी संवेदनशील भूमिका घ्यावी असे मनोविकार तज्ञ डॉ. एस.एच. मोगले यांनी सांगितले