Ganja seized in Beed : काटेवाडी शिवारात तब्बल १९.४९ लाखांचा गांजा जप्त; ऊसाच्या शेतात बेकायदेशीर लागवड करणारा शेतकरी अटकेत

धारूर पोलिसांची रात्रीची धडक कारवाई
Ganja seized in Beed : काटेवाडी शिवारात तब्बल १९.४९ लाखांचा गांजा जप्त; ऊसाच्या शेतात बेकायदेशीर लागवड करणारा शेतकरी अटकेत
Published on
Updated on

अतुल शिनगारे

धारूर : तालुक्यातील काटेवाडी शिवारात पोलिसांनी धाडसी कारवाई करत ऊसाच्या शेतामध्ये बेकायदेशीररीत्या लागवड करण्यात आलेला तब्बल १९ लाख ४९ हजार ४४० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. या प्रकरणी शेतमालकास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस), १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १०.१० वाजण्याच्या सुमारास धारूर तालुक्यातील काटेवाडी येथील गट क्रमांक ३७ मधील ऊसाच्या शेतामध्ये बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे धारूर पोलिसांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी छापा टाकला. कारवाईदरम्यान तूकाराम दत्तात्रय गोरे (रा. काटेवाडी) यांच्या मालकीच्या शेतातून हिरवी पाने, फुले, बोंडे, खोड, कळ्या तसेच मातीसह उपटलेली गांजाची ओलसर झाडे जप्त करण्यात आली.

Ganja seized in Beed : काटेवाडी शिवारात तब्बल १९.४९ लाखांचा गांजा जप्त; ऊसाच्या शेतात बेकायदेशीर लागवड करणारा शेतकरी अटकेत
Beed crime : लाचखोर सरपंचावर अपात्रतेची कारवाई ; विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय

जप्त केलेल्या गांजाचे एकूण वजन ९७ किलो ४७२ ग्रॅम असून त्याची अंदाजे बाजार किंमत १९ लाख ४९ हजार ४४० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात आरोपीने कोणताही कायदेशीर परवाना न घेता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ऊसाच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच हा गांजा स्वतःच्या सेवनासाठी तसेच विक्रीच्या उद्देशाने पिकविण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Ganja seized in Beed : काटेवाडी शिवारात तब्बल १९.४९ लाखांचा गांजा जप्त; ऊसाच्या शेतात बेकायदेशीर लागवड करणारा शेतकरी अटकेत
Beed Crime: वाहन फिटनेस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश; नोएडातून सॉफ्टवेअर अभियंता अटकेत

या प्रकरणी २९ जुलै २०२६ रोजी पहाटे ४.५३ वाजता धारूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अधिनियम, १९८५ अंतर्गत कलम २० व २०(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, बीड, अप्पर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक, केज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये धारूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घुगे, धारूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार सुरेश पाळवदे, पोलीस उपनिरीक्षक मुकुंद ढाकणे, सहाय्यक फौजदार रमाकांत भुसारी, पोलीस हवालदार धोंडीराम मोरे, संजय मुंडे, प्रशांत मस्के, नाना निगुळे, गोविंद खाडे, जमीर शेख, राजू गुंजाळ तसेच तहसील कार्यालयातील लक्ष्मण मुळे व संजय धबडगे यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news