हृदयद्रावक : गोव्यात १८ महिन्यांच्या चिमुकलीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

बाणावली येथे झारखंडमधील चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Banavali  Girl Death
बाणावली येथे १८ महिन्यांच्या चिमुकलीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.Pudhari News Network

मडगाव, पुढारी वृत्तसेवा: बाणावली येथे भाड्याच्या खोलीत रहाणाऱ्या झारखंडच्या कुटुंबातील १८ महिन्यांच्या चिमुकलीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.५) घडली .

Banavali  Girl Death
नागपूर, गोवा विमानसेवा आता आठवड्यातून चारच दिवस

मिळालेल्या माहितीनुसार मृत चिमुकलीचे कुटुंब नुकतेच कामाच्या निमित्ताने गोव्यात आले होते. ही दुर्घटना घडली त्यावेळी मुलीचे वडील कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. खेळत असताना मुलीचा विजेच्या वाहिन्यांशी संपर्क आल्यामुळे तिचा मृत्यू झाला. विजेचा धक्का लागल्यामुळे बेशुद्ध झालेल्या त्या मुलींला कुटुंबातील लोकांनी रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. कोलवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news