Parli Vaijnath Wan Dam Security | दुष्काळाचे गंभीर संकट; वाण धरणावर २४ तास पहारा

‘तळे राखेल तरच पाणी टिकेल’; अनधिकृत उपसा रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
Nagapur Wan Dam
Nagapur Wan Dam Parli Vaijnath Pudhari
Published on: 
Updated on: 

Nagapur Wan Dam

परळी वैजनाथ : परळी वैजनाथ तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, प्रमुख जलसाठ्यांमधील पाणी झपाट्याने कमी होत आहे. तालुक्यातील आठ प्रमुख जलसाठ्यांपैकी तीन जलसाठ्यांमध्ये १० टक्क्यांपेक्षाही कमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. शहरासह तालुक्यातील सुमारे १५ गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पातही केवळ १९.७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आगामी काळातील पाणीटंचाईची संभाव्य तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने वाण धरणाच्या जलसाठ्याच्या संरक्षणासाठी २४ तास पहारा तैनात केला आहे.

उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्यासोबतच अनधिकृत पाणी उपसा रोखणे आणि पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. परळीचे तहसीलदार विनोद रणवरे यांनी यापूर्वी अनधिकृत पाणी उपशाविरोधात कारवाई केली असून, आता वाण धरणावरील पाणीसाठ्याच्या संरक्षणासाठी विशेष पथकांची नियुक्ती केली आहे.

Nagapur Wan Dam
Parli Vaijnath Theft | मोंढा मार्केटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; शटर उचकटून पाच लाखांवर डल्ला

दोन पाळ्यांत पथकांचा पहारा

वाण प्रकल्पातील पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी दोन पाळ्यांमध्ये २४ तास पथक तैनात करण्यात आले आहे. सकाळी ८ ते रात्री ८ आणि रात्री ८ ते सकाळी ८ अशा दोन पाळ्यांमध्ये कर्मचारी पहारा देतील. जलसाठ्यातून कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेकडून अनधिकृतपणे पाणी उपसा होऊ नये, यासाठी या पथकांकडून सतत देखरेख ठेवण्यात येणार आहे.

या पथकांमध्ये ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी, तलाठी, महसूल सेवक, नगरपरिषद कर्मचारी, महावितरण कर्मचारी, लघुपाटबंधारे विभागाचे कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि पोलिस पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. जलसाठ्याचे संरक्षण करण्याबरोबरच अवैध पाणी उपसा आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची जबाबदारीही पथकांवर राहणार आहे.

Nagapur Wan Dam
Parli Vaijnath | परळी वैजनाथ: वैद्यनाथ मंदिरात अखेरच्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी

१५ गावांचा पाणीपुरवठा धोक्यात

वाण धरणाची एकूण क्षमता सुमारे १९.७१ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या या धरणातील उपयुक्त पाणीसाठा २० टक्क्यांच्या आत आला आहे. परळी शहरासह तालुक्यातील सुमारे १५ गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी हा जलस्रोत महत्त्वाचा आहे. त्यामुळे वाणमधील पाणीसाठा आणखी घटल्यास त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. परिणामी, उपलब्ध पाणीसाठ्याची काटेकोरपणे राखण करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

वाण धरणातील उपयुक्त पाणीसाठा २० टक्क्यांच्या आत आला आहे. परळी शहरासह तालुक्यातील सुमारे १५ गावांना या जलस्रोताचा आधार आहे. त्यामुळे जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार विविध उपाययोजना सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वाण धरणावर २४ तास पहारा देण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

— विनोद रणवरे, तहसीलदार, परळी वैजनाथ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news