बीड: शाळेत दारू पिऊन 'मास्तर'ची एन्ट्री

केज तालुक्यातील प्राथमिक शाळेतील प्रकार
School discipline issues
दारू पिऊन शिक्षकाने शाळेत प्रवेश केला
Published on
Updated on

केज : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत प्रतीनियुक्तीवर असलेले सहशिक्षक हे तीन दिवसापासून बेकायदेशीररीत्या गैरहजर होते आणि ते सोमवारी (दि.७) शाळेत हजर झाले. त्यावेळी त्यांनी मद्यपान केले असल्याचे मुख्याध्यापिका आणि विद्यार्थ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ही माहिती शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना दिली. मद्यपी शिक्षकाला वर्गात प्रवेश नाकारला. शिक्षकाने मद्यप्राशन केल्याची चर्चा होताच शिक्षकाने शाळेतून पलायन केले.

School discipline issues
बीड : अंगणवाडीतील साडेपाच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

याबाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेवर प्रतिनियुक्तीवर असलेले शिक्षक व्यंकट मुंडे हे सोमवारी (दि.७) सकाळी ११:०० च्या सुमारास उशिरा शाळेत आले. मात्र त्यांनी मद्य पिऊन आले. याचा संशय मुख्याध्यापिका सिंधू मुंडे यांना आल्यानंतर खबरदारी म्हणून मुख्याध्यापिका मुंडे यांनी त्या शिक्षकाला वर्गावर जाण्यापासून रोखले आणि या सर्व प्रकारची कल्पना त्यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान बचुटे यांना फोनवरून दिली. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून याची माहिती गावकऱ्यांनाही झाली. त्यानंतर काहींनी ही माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांच्यासह युसुफवडगाव पोलीस ठाण्याला दिली. हा सर्व प्रकार महादेव मुंडे यांच्या लक्षात येताच त्यांनी गावातून पोबारा केला.

केज तालुक्यातील या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत प्राथमिक शाळा आहे. येथील विद्यार्थी संख्या ही २१ असून त्या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून सिंधू मुंडे या कार्यरत आहेत. तर ट्रेनी शिक्षिका म्हणून कुमारी प्रीती जाधव आणि मांगवडगाव शाळेतील सहशिक्षक महादेव मुंडे यांची दिनांक १३ ऑगस्ट २०२४ पासून प्रतिनियुक्ती करण्यात आली.

शुक्रवारपासून गुरुजीची दांडी

महादेव मुंडे ३ ऑक्टोबरला शाळेत हजर होते. त्यानंतर त्यांनी ४ ऑक्टोबरला मुख्याध्यापिका सिंधू मुंडे यांना फोन करून त्यांची किरकोळ रजा मंजूर करण्याचे कळविले. त्यावरून मुख्याध्यापिका मुंडे यांनी तशी नोंद केली आहे. मात्र किरकोळ रजा घेण्यापूर्वी लेखी अर्ज सादर करून रजा मंजूर झाल्यास नंतर स्थलांतरास परवानगी दिली जाते. मात्र मुख्याध्यापिका मुंडे यांनी केवळ फोनवर किरकोळ रजा कशी काय मंजुर केली ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या पूर्वीही मद्य पिऊन केली होती वरिष्ठांना शिवीगाळ

यापूर्वी १४ मार्च रोजी केज येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर हे दुपारी २:३० वाजता मध्यंतरच्या वेळेत घराकडे जात असताना केज पंचायत समिती कार्यालयासमोर त्यांना तीन शिक्षकानी रस्त्यात अडवून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी गट शिक्षणाधिकारी बेडसकर यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात महादेव मुंडे आणि इतरांवर गुन्हा दाखल झाला होता. तसेच लाखा येथील ग्रामस्थ आणि पालकांच्या तक्रारी वरून मुंडे यांना शाळेवर येण्यास विरोध केल्याने त्यांना वरिष्ठ कार्यालयात हलविले होते.

School discipline issues
बीड : लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणाला भरधाव कारने उडवल्याने जागीच मृत्यू

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news