Beed sugarcane workers : ऊसतोड कामगारांच्या मागण्यांसाठी संघटना आक्रमक

मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारण्याचा निर्धार; दरवाढीसह आरोग्य सुविधांची मागणी
Beed sugarcane workers
Beed sugarcane workerspudhari photo
Published on
Updated on

बीड : महाराष्ट्रातील सुमारे २५ लाख ऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी लोकनेते मुंडे साहेब ऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदार संघटना आक्रमक झाली आहे. मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नवीन ऊसतोडणी दर करारासाठी साखर संघाकडे १९ कलमी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असून, मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रासह कर्नाटकातील साखर कारखान्यांचे गाळप रोखण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

२०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या तीन हंगामांसाठी झालेल्या करारात ऊसतोडणी दरात ३४ टक्के वाढ करण्यात आली होती. या कराराची मुदत आता संपल्याने आगामी हंगामासाठी नवीन दर करार करण्याची मागणी संघटनेने केली आहे. ऊसतोडणी व वाहतूक मजुरीमध्ये १०० टक्के वाढ, बैलगाडी, गाडी-सेटर, मिनी ट्रॅक्टर, ट्रक व ट्रॅक्टर वाहतुकीच्या दरात वाढ तसेच मुकादमांच्या कमिशनमध्ये ५० टक्के वाढ करण्याची प्रमुख मागणी आहे.

Beed sugarcane workers
Dharashiv Rameshwar ZP school : पत्रे उडाले; प्रशासनाची झोप उडणार कधी?

कामगारांच्या कुटुंबांसाठी निवासाची व्यवस्था व स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याबरोबरच कारखाना बंद राहिल्यास कामगारांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. कामगारांच्या मजुरीतून चरई, बांबू व कोयते यांचे पैसे कपात करू नयेत, तसेच कामगार नोंदणीच्या नावाखाली पैसे वसूल करणाऱ्या एजन्सींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ऊसतोड महामंडळाचा निधी कामगारांच्या आरोग्य विम्यासाठी आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरण्यात यावा, अशी मागणीही संघटनेने केली आहे. नवीन दर करारासाठी साखर संघाने तातडीने बैठक बोलावून मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे.

Beed sugarcane workers
Jalna rain shortage : पावसाचे अलर्ट कोरडे,पाण्याचा ठणठणाट

विमा, आरोग्य अन् शिक्षणावर भर

ऊसतोड कामगार व मुकादम यांचा कारखान्यांनी अनिवार्यपणे विमा काढावा, कामगारांचा कामगार कायद्यात समावेश करावा आणि अपघातात जखमी झालेल्या अथवा मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी विशेष शैक्षणिक योजना व शिष्यवृत्ती सुरू करावी, कारखाना परिसरात शाळा, दवाखाना आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी आहे.

‘मागण्या मान्य न झाल्यास गाळप रोखू’

ऊसतोड कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. मागण्यांवर सकारात्मक तोडगा न निघाल्यास महाराष्ट्रासह कर्नाटकातील साखर कारखान्यांचे गाळप सुरू होऊ देणार नाही, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष कृष्णा शिवदास तिडके व सचिव गोरक्ष दादा रसाळ यांनी दिला आहे. “घाम आमचा... हक्कही आमचाच... आता अन्याय सहन करणार नाही,” अशी भूमिका संघटनेने स्पष्ट केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news