बीड : केजमध्ये काळवीटची शिकार; सहा जणांना अटक

काळवीटची तस्करी करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता
Deer hunting in beed
केजमध्ये काळवीटची शिकार करण्यात आली.
Published on
Updated on

केज (बीड) : काळवीटाची शिकार करून त्याचे मांस व चमड्याची तस्करी करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील सहा संशयित आरोपींना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आज (दि.१५) अटक केली. या रॅकेटमधील आणखी काहीजण हाती लागण्याची शक्यता आहे.

Deer hunting in beed
बीड : सुरक्षा व्यवस्थेबाबत राज ठाकरेंनी व्यक्त केली नाराजी

केज तालुक्यातील केकत सारणी येथील शिवारात काळवीट जाळ्यात पकडून त्याची मान धारदार शस्त्राने कापून शिकार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ही माहिती धारूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तम चिकटे यांच्या आदेशाने वनरक्षक वचिष्ट भालेराव, वाहन चालक शाम गायसमुद्रे हे तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृत काळवीटसह सहा जणांना रंगेहाथ अटक केली. त्यानंतर चंदनसावरगाव येथील पशू वैद्यकीय दवाखान्यात या काळवीटचे शवविच्छेदन करण्यात आले. केज तालुक्यात काळवीटची शिकार करून त्याचे मांस व कातड्याची तस्करी करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news