बीड : सुरक्षा व्यवस्थेबाबत राज ठाकरेंनी व्यक्त केली नाराजी

अप्पर पोलीस अधीक्षक पांडकर यांच्याशी चर्चा
Raj Thakarey In Beed
सुरक्षा व्यवस्थेबाबत राज ठाकरेंनी व्यक्त केली नाराजी Pudhari File Photo
Published on
Updated on

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे बीड दौऱ्यांवर आले आहेत. यावेळी त्यांच्या ताफ्यासमोर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांचा ताफा आडवून ठेवला. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करणे आवश्यक होते.

Raj Thakarey In Beed
महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही : राज ठाकरे

परंतु, तसे झालेले नसल्याने शिवसैनिक त्यांच्या गाडीपर्यंत पोहोचू शकले यानंतर राज ठाकरे ज्यावेळी हॉटेलमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याशी चर्चा करत पोलीस बंदोबस्ता विषयी नाराजी व्यक्त केली. तसेच तुमचे इंटेलिजन्स काय करत होते ?असा सवाल देखील त्यांनी केला. तसेच तेथून थेट गृहमंत्र्यांना फोन लावण्याबाबतही राज ठाकरे बोलले. दरम्यान घटनेनंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे देखील या ठिकाणी दाखल झाले होते त्यांनी या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त वाढवण्याच्या सूचना केल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news