

केज :- केज येथे एका अल्पवयीन मुलीचे चक्क एका शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने लैंगिक शोषण केल्याचा प्रकाराच्या चर्चेला उधाण आले आहे. पण याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
केज तालुक्यात शिक्षण विभागात एका अधिकाऱ्याने एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्या असल्याच्या चर्चेला उधाण आलेले आहे. शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या एका अधिकारी हा त्याच्या खाजगी गाडीतून एक महिला व त्या अल्पवयीन मुलीला घेऊन जात होते. त्या मुलीशी तो अधिकारी तिच्याशी गैरवर्तन करीत असल्याचे महिलेच्या लक्षात आले. म्हणून तिने मदतीसाठी संपर्क साधला. त्या नंतर काही युवकांनी त्या मुलीची नराधमाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी पाठलाग करून त्यांना अडविले. त्या नंतर सदर नराधम हा त्याचा मोबाईल आणि गाडी सोडून पळून गेला.
त्या नंतर ती महिला व ती अल्पवयीन मुलगी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून तिच्यावर झालेली आपबिती पोलिस अधिकाऱ्या समोर कथन केली. तो नराधम कोण ? आणि आता त्याच्यावर काय कारवाई होईल याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. तसेच या बाबतचे व्हिडीओ देखील उपलब्ध झाले असल्याची चर्चा सुरू आहे?