

केज :- केज तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून गुटख्यासह वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येत असलेले पिकअप असा ३४ लाख ४६ हजार रु चा मुद्देमाल आणि दोघांना ताब्यात घेतले आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील मस्सासाजोग शिवारात रोहित आसाराम देशमुख यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवला असल्याची माहिती प्राप्त झाल्या नंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या पथकाने जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली २६ सप्टेंबर रोजी ४:३० वाजता वरीष्ठांच्या आदेशाने मस्साजोग येथे रोहित आसाराम देशमुख याच्या शेतात त्यांचे सहकारी पोलिस हवादार आनंद मस्के, अशपाक, परजने, गायकवाड यांच्या पथकाने कारवाई केली.
यावेळी रोहित देशमुख यांनी मस्साजोग शिवातील शेतात महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा ठेवलेला होता. त्यात हिरा पान मसाला, बाबाजी पान मसाला, विमल पान मसाला, गोवा, राजनिवास पान मसाला यासह गुख्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी बोलेरो पिक अप क्र. (एम एच-४४/यू-३५०९) यांच्यासह ३४ लाख ४७ हजार २७० रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार आनंद मस्के यांच्या फिर्यादी वरून रोहित देशमुख आणि साहेबराव आंधळे यांच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम हे पुढील तपास करीत आहेत.