लाडक्या लेकींसाठी बीड पोलिस अलर्ट

मीना बाजारमध्ये १९ टवाळखोरांवर कारवाई; तीन बालिकांची सुखरूप घरवापसी
beed news
लाडक्या लेकींसाठी बीड पोलिस अलर्टFile Photo
Published on
Updated on

Beed Police Alert for Girls

बीड, पुढारी वृत्तसेवा : महिला व मुलीविषयक दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांकडून अलर्ट मोडवर काम केले जात आहे. यामध्ये नुकताच बीडमध्ये आयोजित केलेल्या मीना बाजारमध्ये महिला, मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या १९ टवाळखोरांवर दामिनी पथकाकडून कारवाई करण्यात आली तर घरातून निघून गेलेल्या तीन बालिकांना सुखरूपपणे कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले.

beed news
Nanded News : नांदेडमध्ये 95 फटाका बुलेटस्वारांवर कारवाई

शहरातील मीना बाजार परिसरात मुलींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांविरुद्ध दामिनी पथकाने धडक कारवाई करत मागील चार दिवसांत १९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे बाजार परिसरात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे दामिनी पथकप्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकान मीना बाजारात साध्या वेशात गस्त घातली. यावेळी काही युवक मुलींच्या मागे फिरणे, अश्लील हावभाव करणे व इशारे करताना आढळून आले.

beed news
Jalna News : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरूच

या टवाळखोरांना तात्काळ ताब्यात घेऊन बीड शहर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले व त्यांच्यावर मुंबई पोलिस अधिनियम कलम ११० व ११७ अन्वये कारवाई करण्यात आली. तसेच बाजाराबाहेरील परिसरात आढळलेल्या काही जणांनाही शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. कारवाईसोबतच संबंधित युवकांचे समुपदेशनही करण्यात आले असून भविष्यात अशा प्रकारांना आळा बसावा, यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

मीना बाजार परिसरात महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. मुलींना त्रास देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अजिबात सहन केले जाणार नाही. तसेच नागरिकांनीही अशा घटना निदर्शनास आणून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत कांवत व अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news