Nanded News : नांदेडमध्ये 95 फटाका बुलेटस्वारांवर कारवाई

कर्नकर्कश आवाज करणा-या दोन डीजे चालकांवरही कारवाई
Nanded police action on bullet riders
पोलिसांनी फटाका बुलेट वापरणाऱ्या 95 हुल्लडबाजांवर कारवाई केली. pudhari photo
Published on
Updated on

नांदेड : नांदेड शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन होत असताना, कांही हुल्लडबाज व अतिउत्साही तरुणांनी फटाका बुलेट व दुचाकीच्या हॉर्नमध्ये कर्णकर्कश आवाजांचा वापर करून वातावरण दूषित करणार्‌‍या 95 जणांवर जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिलेल्या आदेशावरून 6 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दोन दिवसांत 95 दुचाकी व बुलेटवर कारवाई करत जप्त केले आहेत. या प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर कर्नकर्कश आवाज करणार्‌‍या दोन डीजे चालकांवर ही कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात दोन दिवसांपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. मिरवणुका विधायक उपक्रमांनी जयंती साजरी करत असताना दुसरीकडे मात्र काही अतिउत्साही व हुल्लडबाज तरुणांनी कर्नकर्कश आवाज करणार्‌‍या बुलेट व दुचाकींचा वापर करून बेफाम दुचाकी चालवून वातावरण कलुषित केले होते.

Nanded police action on bullet riders
Parbhani News : बोरीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून तणाव

याबाबत तक्रार झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी तातडीने दखल घेत शहरातील सर्वच पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 18, नांदेड ग््राामीण 12, वजिराबाद 17, इतवारा पोलिस ठाणे 1, विमानतळ पोलिस ठाणे 25, वजिराबाद 4 अशा जवळपास 95 दुचाकींवर जप्तीची कारवाई करून संबंधित मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्सव समारंभाच्या काळात शांतेत सण साजरे करण्याचे आदेश असताना अशा प्रकारच्या हुल्लडबाजांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत केले जात आहे. तसेच कर्नकर्कश आवाज करणार्‌‍या दोन डीजे चालकांविरोधातही भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news