Parli Youth Drowns | दशक्रिया विधीसाठी गेलेल्या तरुणाचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू

परभणी जिल्ह्यातील रामपुरी येथील घटना
Youth Drowns In Godavari River
Youth Drowns In Godavari RiverPudhari
Published on
Updated on

Youth Drowns In Godavari River

परळी वैजनाथ : परळी तालुक्यातील हिवरा (गो) येथील रहिवासी सुरेश रासवे (वय 50) यांचा परभणी जिल्ह्यातील रामपुरी येथे गोदावरी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी गेले असताना ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश रासवे हे नातेवाईकांच्या दशक्रिया कार्यक्रमासाठी रामपुरी (ता. मानवत) येथे गेले होते. दरम्यान, गोदावरी नदीत पोहत असताना ते अचानक बेपत्ता झाले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तत्काळ शोधमोहीम सुरू केली.

Youth Drowns In Godavari River
Parli Crime | ऊसतोड मजुरांच्या उचल रकमेतून वाद; युवकाचे अपहरण, तिघे आरोपी ताब्यात

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी नगरपरिषद कर्मचारी, पोलीस प्रशासन, तलाठी, एनडीआरएफ पथक तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने व्यापक शोधमोहीम राबविली. जवळपास 30 ते 40 फूट खोल पाण्यात शोधकार्य करण्यात आले.

सुमारे तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दुपारी 3 ते 3.15 वाजण्याच्या सुमारास सुरेश रासवे यांचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठविण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे हिवरा (गो) गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news