Parli Crime | ऊसतोड मजुरांच्या उचल रकमेतून वाद; युवकाचे अपहरण, तिघे आरोपी ताब्यात

परळी शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा
Parli Youth Kidnapped
अपहरणाच्या गुन्ह्यात वापरलेली गाडीPudhari
Published on
Updated on

Parli Youth Kidnapped

परळी वैजनाथ : ऊस तोडीच्या उचल रकमेतून झालेल्या वादातून एका युवकाचे अपहरण करून त्याला मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 19) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास परळी वैजनाथ येथील मौढा परिसरातील अरुणोदय मार्केट येथे ही घटना घडली. पीडित विनोद नवनाथ वैरागे (रा. स्वाभिमाननगर, परळी वैजनाथ) यास उसतोडीसाठी घेतलेल्या उचल रकमेसंदर्भात आरोपींनी जाब विचारला. त्यानंतर संगनमत करून विनोद वैरागे यास मारहाण करण्यात आली तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. त्यानंतर त्याचे बळजबरीने अपहरण करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

Parli Youth Kidnapped
Beed Crime News | घरकुलधारकांच्या वाळूवर डल्ला मारणाऱ्यांना कायद्याचा दणका

या प्रकरणी राजू प्रल्हाद कांबळे (रा. सोरजा, ता. जिंतूर, जि. परभणी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 160/2026 दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्यात आप्पाराव उर्फ माऊली उजगरे, सविन आप्पाराव उजगरे, विश्वजित ज्ञानेश्वर कदम, गिरीधर शत्रुघ्न पुरी, दीपक चव्हाण आणि सचिन संतोष कदम यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Parli Youth Kidnapped
Beed Crime News : केजमध्ये दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून लुटले; पोलिसांनी अवघ्या ४ तासांत दोघांना केले जेरबंद

या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनेत वापरण्यात आलेली एमएच-46 एयू-5981 क्रमांकाची चारचाकी गाडी जप्त केली असून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मात्र अद्याप कोणताही मुद्देमाल हस्तगत झालेला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंगणे हे करत आहेत. परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नाचण यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news