

Parli Mahadev Munde Murder Case SIT reward
परळी वैजनाथ : परळीतील व्यावसायिक महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत यांनी आता नागरिकांना थेट आवाहन केले आहे. या खून प्रकरणाची कुठलीही माहिती असल्यास ती पोलिसांना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यासाठी कुमावत यांनी त्यांचा 9990782431 हा व्हॉट्सअॅप नंबर दिला आहे. ज्याला कुणाला या प्रकरणाची माहिती असेल, ती त्यावर द्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
राज्यात सध्या गाजत असलेल्या महादेव मुंडे खून प्रकरणाची चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एसआयटीने या प्रकरणाची माहिती महादेव मुंडे यांचे भाऊ व या प्रकरणातील फिर्यादी अशोक मुंडे आणि वडील दत्तात्रय मुंडे यांच्याकडून जाणून घेतली. घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली होती. यानंतर पुढील तपासासाठी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाची कुठलीही माहिती असल्यास त्यांनी ती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पंकज कुमावत यांनी केले आहे.
त्यासाठी कुमावत यांनी त्यांचा व्हॉट्सअॅप नंबर दिला आहे. यावर माहिती द्यावी. तसेच अशी कोणतीही माहिती देणाऱ्याचे नाव कुठल्याही परिस्थितीत उघड केले जाणार नसल्याची ग्वाहीही देण्यात आली आहे. तसेच माहिती देणाऱ्याला बक्षीस देखील देण्यात येणार असल्याचे एका प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे.