Parli Vaijnath Theft | परळी बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट; बसमध्ये चढताना निवृत्त एसटी चालकाचा कापला खिसा

चोरट्याने पॅन्टच्या उजव्या खिशातील २५ हजारांची रोकड लंपास
Theft Case
Theft Case Pudhai
Published on
Updated on

Parli Bus Stand Theft Case

परळी वैजनाथ : परळी वैजनाथ बसस्थानक परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एका निवृत्त एस.टी. चालकाला चोरट्यांनी गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

विठ्ठल संतराम फड (वय ६४, रा. मरळवाडी ता. परळी वैजनाथ) हे मुंबईला जाण्यासाठी परळी बसस्थानकावर आले होते. ते परळी ते बोरीवली एस.टी. बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पॅन्टच्या उजव्या खिशातील रोख रक्कम चोरून नेली.

Theft Case
Parli Vaijnath Theft Case | नव्या घरी गुढी उभारायला गेले, अन् जुन्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला; परळीत खळबळ

या चोरीमध्ये पाचशे रुपयांच्या ५० नोटा असा एकूण २५ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच विठ्ठल फड यांनी तक्रार दाखल केली असून, संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार नागरगोजे करत आहेत. दरम्यान, बसस्थानक परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news