Kaij News | केजमध्ये ध्वनीमर्यादेचे उल्लंघन; दोन डीजे चालकांसह संयोजकांवर गुन्हा दाखल

टिपू सुलतान जयंती मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडल्याचा आरोप; पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष
Case Registered
Case Registeredfile photo
Published on: 
Updated on: 

Kaij Noise Pollution Violation

केज : केज शहरात टिपू सुलतान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ध्वनी क्षमतेच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन डीजे चालकांसह जयंती उत्सव समितीच्या दोन संयोजकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरगम बँजो आणि महाराजा ७७+ या डीजेंवर ध्वनीमर्यादा ओलांडल्याचा आरोप आहे.

२० नोव्हेंबर रोजी केज शहरात टिपू सुलतान जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त जुना मोंढा आणि इस्लामपुरा परिसरातून मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. या मिरवणुकांमध्ये सहभागी असलेल्या सरगम बँजो आणि महाराजा ७७+ यांच्या ध्वनी क्षमतेची तपासणी करण्यात आली. यावेळी निर्धारित आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी कारवाई केली.

Case Registered
Kaij Crime | एसटी बसच्या बॉनेटवर बसून 'केज सोडून दाखव’ म्हणत जीवे मारण्याची चालकाला धमकी

पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या आदेशानुसार पोलिस कॉन्स्टेबल भारत गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इस्लामपुरा येथील जयंती उत्सवाचे संयोजक अकबर उस्मान सय्यद, सरगम बँजोचे चालक-मालक तसेच जुना मोंढा येथील संयोजक अस्लमोद्दीन मोईजोद्दीन इनामदार आणि महाराजा ७७+ डीजेचे चालक-मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम २००० मधील कलम ५ व ७ अन्वये ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपने करीत आहेत.

पोलिसांनी आधीच दिल्या होत्या सूचना

टिपू सुलतान जयंतीच्या मिरवणुकीत ध्वनीमर्यादेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी जयंती उत्सवाच्या संयोजकांसह डीजे चालकांना यापूर्वीच स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.