Kaij Crime | एसटी बसच्या बॉनेटवर बसून 'केज सोडून दाखव’ म्हणत जीवे मारण्याची चालकाला धमकी

जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याचा प्रकार केज येथे घडला
  Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

Kaij ST Bus Driver Threatened

केज : एसटी बसच्या इंजिनच्या बॉनेटवर बसून प्रवास करणाऱ्या एका कथित एसटी कर्मचाऱ्याने कर्तव्यावरील चालकाला गच्ची धरून धक्काबुक्की केली. तसेच, जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याचा प्रकार केज येथे घडला. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५:४५ वाजता बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आगाराची शेगाव-पंढरपूर एसटी बस (एमएच १४/एमएच ३००१) केजहून पंढरपूरकडे जात होती. केज येथील छत्रपती शिवाजी चौकातून बसमध्ये चढलेल्या एका प्रवाशाने इंजिनच्या बॉनेटवर बसून प्रवास सुरू केला. बस सुमारे २०० मीटर पुढे गेल्यानंतर चालक शिवाजी गोवर्धन राठोड यांनी त्याला व्यवस्थित बसण्यास सांगितले.

  Crime News
Beed Crime News : डोक्यात दगड घालून पत्नीला संपविले

यावेळी संबंधित व्यक्तीने आपण एसटी महामंडळाचा कर्मचारी असल्याचे सांगत ओळखपत्र दाखविले. ओळखपत्रावर जाधवर असे नाव असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्याने चालक राठोड यांची गच्ची धरून, ‘तू केज सोडून दाखव, मी पन्नास तरुण जमा करून तुला जीवे मारले तरी कोणाला पत्ता लागणार नाही,’ अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून चालकाच्या शासकीय कर्तव्यात अडथळा आणला.

चालक शिवाजी राठोड यांच्या तक्रारीवरून जाधवर नावाच्या कथित कळंब आगार कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपने तपास करीत आहेत.

  Crime News
Beed Crime News : परळी कापड दुकानात चोरी केली आंतरराज्य टोळीने !

संबंधित कर्मचारी नेमका कोण?

कळंब आगाराचे आगार व्यवस्थापक घोलप यांच्याशी संपर्क साधला असता, जाधवर नावाचे अनेक कर्मचारी आगारात कार्यरत असल्याने संबंधित व्यक्ती नेमकी कोण आहे, हे निश्चित सांगता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संबंधित व्यक्ती एसटी महामंडळाची अधिकृत कर्मचारी आहे की नाही, याबाबतही पडताळणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.