Beed News | सासऱ्याच्या प्रेमविवाहाची सुनेला शिक्षा; सात पिढ्या बहिष्कृत!

अडीच लाखांचा दंड न भरल्याने जात पंचायतीने दिला आदेश; आष्टीत ९ जणांवर गुन्हा
Beed News
आष्टीमध्ये जात पंचायतीचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. Instagram
Published on
Updated on

आष्टी : जात पंचायतीचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. सासऱ्याने समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला. त्यामुळे त्याला अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला. त्यांनी तो न भरल्याने सुनेसह मुलाला जात पंचायतमध्ये बोलावले. त्यांनीही असमर्थता दर्शविल्याने पंचांनी या कुटुंबाला सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास जिवे मारू अशा, धमक्याही दिल्या. हा प्रकार २२ सप्टेंबर २०२४ रोजी आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे घडला.

तुम्ही दंड भरा

Summary

२२ सप्टेंबर रोजी सकाळी या कुटुंबाला जात पंचायतीच्या ११ पंचांसमारे उभे केले. सासऱ्याने दंड भरला नाही म्हणून तुम्ही भरा, असे त्यांना फर्मावले. दंड भरला नाही तर समाजातून बहिष्कृत करू, पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारू अशा धमक्या दिल्या. दंड भरू न शकल्याने पंचांनी मालन यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला ७ पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला.

हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, अखेर ९ जणांविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा जात पंचायतीच्या प्रभावाचा मुद्दा समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मालन शिवाजी फुलमाळी (वय ३२ रा. कडा कारखाना ता. आष्टी) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. मालन यांचे सासरे नरसू फुलमाळी यांनी समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला होता. त्यांची जात नंदीवाले (तीरमाली) आहे. तेव्हा जात पंचायत बसविण्यात आली. पंचायतीने नरसू फुलमाळी यांना अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला. परंतु अनेक वर्ष उलटल्यानंतरही त्यांनी हा दंड भरला नाही. त्यामुळे २१ सप्टेंबर २०२४ रोजी शिवाजी पालवे (रा. धमगरवाडी ता. नेवासा जि. अहमदनगर) यांच्यामार्फत जात पंचायतीमध्ये मालन यांना बोलावण्यात आले. ही पंचायत आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे होती. त्याप्रमाणे त्या पती शिवाजी, मुलांसह तेथे पोहचल्या. या ठिकाणी पंचांसह समाजाचे ८०० ते ९०० लोक आगोदरच जमलेले होते. त्यादिवशी निर्णय झाला नाही. जात पंचायतीच्या कठोर निर्णयामुळे सासऱ्याच्या प्रेमविवाहाची सुनेला शिक्षा; सात पिढ्या बहिष्कृत !

हतबल झालेल्या मालन यांनी अखेर आष्टी पोलिस ठाणे गाठत तक्रार केली. त्यावरून गंगाधर बाबु पालवे (रा. धनगरवाडी ता. नेवासा जि. अहमदनगर), उत्तम हनुमंत फुलमाळी (रा. जेवुन आयबत्ती ता. नेवासा जि. अहमदनगर), गंगा गंगाराम फुसमाळी (रा. पाटसरा ता. आष्टी), चिन्नु साहेबराव फुल माळी (रा. डोईठाण ता. आष्टी), सुभाष फुलमाळी (रा. शणी शिंगनापुर जि. अहमदनगर), बाबुराव साहेबराव फुलमाळी (रा. निमगाव गांगरडा ता. कर्जत जि. अहमदनगर), शेटीबा रामा काकडे (रा. वाळकी जि. अहमदनगर), सयाजी सायबा फुलमाळी (रा. पिंपळनेर जि. बीड), गुलाब पालवे (रा. धनगड वाडी जि. अहमदनगर), यांच्यासह इतर पंचांवर सामाजिक बहिष्कार अधिनियम २०१६ मधील जनतेचे महाराष्ट्र संरक्षण ४, ५, ६ तसेच बीएनएस १८९ (२), ३५१ (२) (३), ३५२ अशा कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणात पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत हिंगे यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news