Beed News : चंपावती शाळेतील बोगस पटसंख्येचे प्रकरण; शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह !

उत्तराखंडमधील विद्यार्थ्यांच्या नोंदी, २९५ विद्यार्थी कमी असल्याची माहिती; मुख्याध्यापक निलंबित, गुन्हा नोंदविण्यास उशीर
Beed News
Beed News : चंपावती शाळेतील बोगस पटसंख्येचे प्रकरण; शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह !file photo
Published on: 
Updated on: 

The case of inflated student enrollment figures at Champavati School

बीड : पुढारी वृत्तसेवा : बीड शहरातील नामांकित चंपावती शाळेतील विद्यार्थी पटसंख्येच्या पडताळणीवरून शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. उत्तराखंडमधील विद्यार्थ्यांच्या नोंदी शाळेच्या पटसंख्येत दाखविल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मुख्याध्यापक सारंग जोशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सुरुवातीला तीन विद्यार्थ्यांच्या नोंदींचा मुद्दा समोर आला असताना, पुढील पडताळणीत उत्तराखंडमधील तब्बल २२ विद्यार्थ्यांच्या नोंदी असल्याचे आणि शाळेच्या प्रत्यक्ष पटसंख्येत २९५ विद्यार्थी कमी असल्याचे उघड झाल्याची माहिती आहे. या प्रकरणामुळे शाळेच्या नोंदींची सत्यता, विद्यार्थी पटपडताळणीची प्रक्रिया आणि शिक्षण विभागाच्या नियंत्रण यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Beed News
Beed Gutkha Seized | नेकनूर पोलिसांची धडक कारवाई; जुगार, अवैध दारू व गुटख्यासह २५.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांची संख्या, प्रवेशाच्या नोंदी आणि शैक्षणिक अभिलेख यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. शाळेची पटसंख्या ही केवळ कागदावरील आकडेवारी नसून, त्यावर शिक्षकांची पदे, शासकीय मान्यता, अनुदान आणि विविध प्रशासकीय निर्णय अवलंबून असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नोंदींमध्ये अनियमितता आढळल्यास तिची केवळ कागदोपत्री चौकशी करून भागणार नाही, तर संबंधित नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करून जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. चंपावती शाळेतील प्रकरणाने याच यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

चंपावती प्राथमिक शाळा मगर रोड, बीड़ आकडेवारीमागील नेमके वास्तव काय ? संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश कधी झाले, ते प्रत्यक्षात शिक्षण घेत होते का, त्यांच्या शैक्षणिक नोंदींची पडताळणी झाली होती का आणि पटसंख्येतील तफावतीसाठी कोण जबाबदार आहे, या प्रश्नांची उत्तरे अद्याप स्पष्ट होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या नावांचा वापर करून पटसंख्या वाढविण्यात आली असल्याचे निष्पन्न झाल्यास हा केवळ प्रशासकीय दोष न राहता त्यामागील हेतू आणि संभाव्य आर्थिक लाभांचाही तपास करावा लागणार आहे.

Beed News
Beed Crime : केजमध्ये जुन्या सरकारी दवाखान्याजवळ आढळला अनोळखी युवकाचा मृतदेह

शिक्षण विभागाची भूमिका निर्णायक शाळेतील प्रकरणात मुख्याध्यापकांचे निलंबन ही प्रशासकीय कारवाई झाली असली, तरी एवढ्यावरच थांबता कामा नये. उत्तराखंडमधील विद्यार्थ्यांच्या नोंदींची सत्यता, २९५ विद्यार्थ्यांच्या कथित तफावतीचे कारण, शाळेच्या अभिलेखांची तपासणी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणीची प्रक्रिया यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

तीन विद्यार्थ्यांपासून २२ नोंदीपर्यंत विस्तार

पटपडताळणीची मुदत संपण्यापूर्वी शाळेच्या पटसंख्येत उत्तराखंडमधील तीन विद्यार्थ्यांच्या नोंदी असल्याचा प्रकार समोर आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार मुख्याध्यापक सारंग जोशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, त्यानंतरच्या पडताळणीत उत्तराखंडमधील विद्यार्थ्यांच्या एकूण २२ नोंदी आढळल्याची माहिती पुढे आली. त्याचबरोबर शाळेच्या नोंदीतील पटसंख्या आणि प्रत्यक्ष विद्यार्थीसंख्या यामध्ये २९५ विद्यार्थ्यांची तफावत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news