Beed Gutkha Seized | नेकनूर पोलिसांची धडक कारवाई; जुगार, अवैध दारू व गुटख्यासह २५.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

मोरगाव फाटा, हिंगणी खुर्द येथे तीन ठिकाणी कारवाई; गुटखा वाहतूक आणि जुगारप्रकरणी गुन्हे दाखल
Neknur Police Illegal Gambling Seized
Neknur Police Illegal Gambling SeizedPudhari
Published on: 
Updated on: 

Neknur Police Illegal Gambling Seized

नेकनूर : नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम राबवत जुगार, अवैध दारू आणि प्रतिबंधित गुटखा वाहतुकीविरुद्ध तीन ठिकाणी धडक कारवाई केली. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवायांमध्ये एकूण २५ लाख ९२ हजार ४०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मोरगाव फाट्यावर कारमधून गुटख्याची वाहतूक

धुळे-सोलापूर महामार्गावरील मोरगाव फाटा परिसरात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती नेकनूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी १२ ऑक्टोबर रोजी पहाटे सापळा रचला. सकाळी आठच्या सुमारास संशयित स्विफ्ट कार (एमएच ०१ बीडी ९४०९) पाठलाग करून अडविण्यात आली.

Neknur Police Illegal Gambling Seized
Beed Accident | केज-मांजरसुंबा रोडवर भीषण अपघातात दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू, पाच जनावरेही दगावली: पिक-अपला टिप्परची धडक!

कारची झडती घेतली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विविध कंपन्यांचा गुटखा आणि पानमसाला आढळून आला. पोलिसांनी ४ लाख ६० हजार ५६ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि ५ लाख ४० हजार रुपये किमतीची कार असा एकूण १० लाख ५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी निलेश नारायण शिंदे (वय ३४, रा. लिंबागणेश, ता. जि. बीड) याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जप्त पदार्थांचे नमुने घेण्यात आले असून, गुटख्याचा पुरवठादार आणि वितरण साखळीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

Neknur Police Illegal Gambling Seized
Beed Crime | सोन्याच्या मोडीच्या नावाखाली चांदीवर सोन्याचा मुलामा देऊन गंडा : धारूरमध्ये सराफा व्यापाऱ्याची १८ लाखांची फसवणूक!

आयशर टेम्पोमध्ये जुगार; १४.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त

मोरगाव फाटा परिसरात आयशर टेम्पोमध्ये सुरू असलेल्या जुगारावरही पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत वाहन आणि रोख रक्कम असा एकूण १४ लाख ८४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी मिर्झा बाबरली यावरली (वय ४४) आणि अली हसन शहाजन मिर्झा (वय २१), दोघेही रा. भगवान नगर, गेवराई, जि. बीड, यांच्याविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगणी खुर्द येथे अवैध दारूविरोधात कारवाई

चौसाळा बिटच्या हद्दीतील हिंगणी खुर्द येथील निसर्ग हॉटेल परिसरात तसेच रस्त्याने अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून, संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तीनही कारवायांमध्ये एकूण २५ लाख ९२ हजार ४०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुटख्याच्या पुरवठा साखळीचा शोध आणि इतर प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे.

Neknur Police Illegal Gambling Seized
Beed Drought : भरपाई दिवाळीपूर्वी देण्यासाठी पीक पाहणी वेळेत पूर्ण करा

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई चेतना तिडके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, केज वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली.

गुटखा वाहतुकीविरोधातील कारवाईत पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, पोलीस हेडकॉन्स्टेबल विशाल क्षीरसागर, पोलीस कर्मचारी सुदाम सानप, सुधाकर जायभाय तसेच होमगार्ड सय्यद इम्रान अली आणि घोळवे यांनी सहभाग घेतला. अवैध दारूविरोधातील कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सचिन धायगुडे, विठ्ठल सांगळे आणि सुशील कारंडे यांनी सहभाग नोंदविला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news