Girl assaulted in Beed: बीडमध्ये विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; आक्षेपार्ह फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

चित्रपटगृहातून आरोपीला पीडितेसह घेतले ताब्यात; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Assault Case
Assault CasePudhari
Published on
Updated on

बीड : वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. एवढेच नव्हे तर पीडितेचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी देत आरोपीकडून तिला ब्लॅकमेल केले जात असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवर तातडीने कारवाई करत आरोपीला शुक्रवारी रात्री चित्रपटगृहातून पीडितेसह ताब्यात घेतले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेख मुस्सवीर, शेख वशीमने तरुणीला बीड शहरातील एका चित्रपटगृहात नेल्याची गोपनीय माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस पथकाने विलंब न करता संबंधित चित्रपटगृह गाठले. तेथे आरोपी शेख मुस्सवीर आणि तरुणीला ताब्यात घेऊन दोघांनाही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

Assault Case
Beed Crime News : अंबाजोगाईत मिनी गंठण चोरीचा तीन दिवसांत छडा; १.५४ लाखांचा ऐवज हस्तगत

पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पीडितेची संवेदनशीलतेने चौकशी करण्यात आली. यावेळी आरोपी शेख मुस्सवीर शेख वशीम (रा. हीना पेट्रोल पंपामागे, मकसूद कॉलनी, बीड) याने पीडितेला पाण्यातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने पीडितेचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ काढले होते. हे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि तिच्या कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी देत तो तिच्यावर दबाव आणत असल्याचेही तपासात समोर आले. शुक्रवारी रात्रीही धमकी देऊन तिला चित्रपटगृहात येण्यास भाग पाडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Assault Case
Beed Crime | कडा येथे तरुणीशी गैरवर्तन; डॉ. महेंद्र पटवा यांच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक अहिल्यानगर येथील रुग्णालयात

गोपनीय माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे पीडितेला आरोपीच्या तावडीतून बाहेर काढण्यात आले. कुटुंबीयांच्या उपस्थितीत पीडितेचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला असून, आरोपीविरुद्ध ारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातीलसंबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news