Beed Crime News : अंबाजोगाईत मिनी गंठण चोरीचा तीन दिवसांत छडा; १.५४ लाखांचा ऐवज हस्तगत

अंबाजोगाई पोलिसांची दमदार कामगिरी; गंठण चोरटा मोटरसायकलसह जेरबंद
Beed Crime News
Beed Crime News : अंबाजोगाईत मिनी गंठण चोरीचा तीन दिवसांत छडा; १.५४ लाखांचा ऐवज हस्तगतfile photo
Published on
Updated on

Ambajogai Mini Ganthan Thieves Stopped in Three Days; Property worth Rs 1.54 lakh seized

अंबाजोगाई : पुढारी वृत्तसेवा शहरातील जिजाऊ चौक पाटीजवळ, मोरेवाडी परिसरात महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण खेचून नेल्याचा गुन्हा अंबाजोगाई शहर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत उघडकीस आणला आहे. तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून पोलिसांनी आरोपीस गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकलसह ताब्यात घेतले असून, चोरीस गेलेले १ लाख ५४ हजार किमतीचे २२ ग्रॅम वजनाचे मिनी गंठण हस्तगत केले आहे.

Beed Crime News
Beed farmers rainfall crisis : माजलगाव तालुक्याकडे पावसाची पाठ

दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी आशा भारतराव चौधरी या जिजाऊ चौक पाटीजवळ, मोरेवाडी येथून जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील मिनी गंठण खेचून चोरून नेले होते. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करताना अंबाजोगाई शहर पोलिसांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सलग दोन दिवस माहिती संकलित केली. त्यातून आरोपीचा माग काढत पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर तीन दिवसांच्या आत धनाजी देविदास शिंदे (वय २६ वर्षे, रा. गंभीरवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव) यास कळंब येथून गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकलसह ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून चोरीस गेलेले २२ ग्रॅम वजनाचे मिनी गंठण, किंमत ₹१,५४,०००/-, तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे.

Beed Crime News
Ramabai Ranveer financial help : मुलीच्या शिक्षणासाठी धावणार्‍या रमाबाईंना प्रशासनाचा आधार

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना मॅडम व सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले, पोलीस हवालदार पांडुरंग काळे व पोलीस अंमलदार हनुमंत चादर यांनी पार पाडली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news