

गेवराई : दोन वर्षीय मुलीला फाशी देऊन त्यानंतर आईने गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी गेवराईतील मालेगाव येथे घडली आहे.दरम्यान, मृत्यूचे कारण अस्पष्ट असून या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
अंकिता बळीराम घवाडे (वय २५)व शिवप्रीती बळीराम घवाडे (वय २) रा.मालेगाव मजरा ता.गेवराई जि.बीड असे या मायलेकीचे नाव आहे. घरातील सर्व कुटुंबीय आज श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने जुन्या मालेगावात धार्मिक कार्यक्रमास गेलेले होते. अंकिता त्यांची दोन वर्षाची मुलगी शिवप्रीती या दोघी घरी होत्या. दुपारी दोन वाजेच्या सुमारास अंकिता घवाडे हिने मुलगी शिवप्रीती हिला फाशी दिली. ती मृत होताच अंकीताने देखील घराच्या हलकडीला गळफास घेऊन आत्महत्या केली.
या मायलेकीचे मृतदेह बीडच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास पाठविण्यात आले असल्याची माहीती तलवाडा पोलिसांनी दिली. दरम्यान,या मायलेकींच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असून, पोलीस तपासात निष्पन्न झाल्यावर खरा प्रकार उघडकीस येईल असे पोलिसानी सांगितले.मात्र या घटनेने मालेगाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.