Bribe Case : पोलिस अंमलदार लाच घेताना पकडल्यानंतर फटाके वाजले

प्रभारी अधिकाऱ्यांनी कामासाठी लाच न देण्याचे केले आवाहन
Beed Bribe Case
Bribe Case : पोलिस अंमलदार लाच घेताना पकडल्यानंतर फटाके वाजलेpudhari photo
Published on
Updated on

Beed News: Firecrackers set off after police official caught accepting a bribe.

नेकनुर, पुढारी वृत्तसेवा : नेकनूर पोलिस ठाण्यात मागच्या पाच वर्षापासून कार्यरत असलेले पोलिस अंमलदार दत्तात्रय बळवंत शनिवारी दुपारी एका होमगार्डसह दहा हजाराची लाच घेताना जालना एसीबीने ठाण्याच्या दारातच पकडले यामुळे हळहळ व्यक्त होण्याऐवजी नागरिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केल्याने कर्मचाऱ्यांनी आपण काय करतोय याचा कुठेतरी विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Beed Bribe Case
Nanded encroachment removal drive : नांदेड मनपाकडून अतिक्रमणांवर दुसऱ्या दिवशीही पोलिस बंदोबस्तात हातोडा

नेकनूर ठाण्यातील या प्रकरणानंतर नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांनी कुठल्याच कामासाठी कोणाला पैसे देऊ नये असे आवाहन करीत स्वच्छ कारभार करणार असल्याची ग्वाही जाहीर केली.नेकनुर, पुढारी वृत्तसेवा : नेकनुर पोलीस ठाण्यात मागच्या पाच र्षात हद्दीतील पवन चक्कीच्या कामाने नेकनूर पोलिसांना नवे अर्थकारण सापडले हा कारभार पोलीस कर्मचारी दत्तात्रय बळवंत याच्याकडे बीट सोबत आला. वमागील वर्षी पवनचक्कीला विरोध करणाऱ्या एका युवकाला कॅरेक्टर खराबची बळवंत यांनी दिलेली धमकी आणि त्याचा व्हिडिओ समोर आल्याने शक्यता असतानाच प्रभारी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याची बाजू सावरून घेतल्याने प्रकरणात बळवंत बचावले.

दुसऱ्या काही प्रकरणातही त्यांना अधिकाऱ्यांनी वाचवले यातून धडा घेणे अपेक्षित असताना कर्मचाऱ्यांच्या गतवर्षी झालेल्या मोठ्या प्रमाणात बदल्या काही जुन्या कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर पडल्या आणि व्यांचा দুনান নারবন गेला प्रभारी अधिकारी बाहेर पडत नसल्याने मोजक्या कर्मचाऱ्यांनी हात धुवून घेताना कुठलीच तमा बाळगली नाही, त्यामुळे अपघात घडून ज्या व्यक्तीच्या बळी गेला त्याच्या कुटुंबाला पंचनामा आणि इतर कागदपत्रे देण्यासाठी पंधरा हजार लाच मागणाऱ्या बळवंतला अखेर दहा हजार घेताना जालना अँटी करप्शन पथकाने ठाण्याच्या समोरच जिग्नंट केले.

Beed Bribe Case
Hingoli Crime : पुसेगावात जमिनीचा वाद, दोन गटात तुंबळ हाणामारी

सोशल मीडियावर एसीबीचे कौतुक

लाचेची रक्कम घेण्यासाठी खासगी माणसासोबत होमगार्डचा वापर मागच्या अनेक वर्षापासून सुरू होता मात्र या कारवाईत बळवंतचा घडा भरल्याने ते यामध्ये अलगद अडकले यानंतर बळवंतचा वाईट अनुभव आलेल्या नागरिकांनी सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणात अँटी करप्शनच्या या कामगिरीचे कौतुक करणाऱ्या पोस्ट केल्या.

काही नागरिकांनी तर रात्री पोलिस ठाण्याच्या समोरील बाजारतळावर येऊन फटाके फोडत आनंद व्यक्त केला. नेकनूर ठाण्याचा कारभार नव्याने आलेल्या एपीआय मंगेश सावळे यांना आठच दिवसात अचंबित करणारा ठरला.

त्यामुळे त्यांनी येथील भ्रष्टाचार क्लीन करण्यासाठी सावध पवित्रा घेत नागरिकांनी यापुढे कुठल्याही कामासाठी कोणत्याच कर्मचाऱ्याला पैसे देऊ नयेत कोणी पैसे मागितले तर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news