Hingoli Crime : पुसेगावात जमिनीचा वाद, दोन गटात तुंबळ हाणामारी

नर्सी नामदेव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसेगाव येथे जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली.
Beed Crime News
Hingoli Crime Newspudhari photo
Published on
Updated on

Hingoli Crime: Land dispute in Pusegaon; violent clash between two groups

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा नर्सी नामदेव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसेगाव येथे जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर दिलेल्या तक्रारीवरून नर्सी नामदेव पोलिसांनी गुरुवारी दोन्ही गटांतील एकूण १२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Beed Crime News
Beed Crime | नांदुरघाट येथे पोलिसांची कारवाई : अवैधरित्या गोवंशीय प्राण्यांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला

पुसेगांव येथील मनोहर नांदेडकर यांनी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ३ जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जागेच्या कारणावरून आठ जणांनी बेकायदेशीर मंडळी जमवून त्यांना व साक्षीदारांना मारहाण केली. या प्रकरणी शेख अखिल, शेख कामिल, शेख अतीक, शेख फिरोज, शेख अजिम, शेख मजीद, शेख शौकत, शेख बाबू (सर्व रा. पुसेगाव) आणि रितेश तिवारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर दुसऱ्या बाजूने मोहम्मद एहसान यांनी फिर्याद दिली आहे. ३ जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास देशमुख हे त्यांच्या आईच्या मालकीची जमीन पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी आम्ही विकत घेतलेल्या जमिनीची पाहणी का करता? असे म्हणून शिवराज नांदेडकर, सूरज नांदेडकर, ओंकार नादेडकर आणि स्वतः मनोहर नांदेडकर यांनी त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली.

Beed Crime News
Nanded encroachment removal drive : नांदेड मनपाकडून अतिक्रमणांवर दुसऱ्या दिवशीही पोलिस बंदोबस्तात हातोडा

या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे, सपोनि अशोक घारगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news