Beed News : शेतकऱ्यांची बँकांकडून अडवणूक; लिंबागणेशमध्ये रास्ता रोको !

जामीनदाराच्या थकीत कर्जामुळे पीककर्ज नाकारल्याचा आरोप; सक्तीची कर्जवसुली थांबविण्याची मागणी
Beed News
Beed News : शेतकऱ्यांची बँकांकडून अडवणूक; लिंबागणेशमध्ये रास्ता रोको !file photo
Published on: 
Updated on: 

Beed News : Blockage of farmers by banks; Stop the road in Limbaganesh!

नेकनूर, पुढारी वृत्तसेवाः दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना शासनाकडून मदतीच्या घोषणा केल्या जात आहेत; मात्र प्रत्यक्षात पीककर्जासाठी शेतकऱ्यांना बँकेच्या दारात अडवणुकीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत गुरुवारी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जामीनदाराच्या खात्यावर थकीत कर्जामुळे पीक कर्जाची प्रक्रिया अडविली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. दुष्काळात शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याऐवजी कर्जाच्या नियमांमध्ये अडकविले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.

Beed News
Dharur News : धारूर ग्रामीण रुग्णालयाची 'आयसीयू'कडे वाटचाल ; 'आरोग्यदूत' अन् आमदारांची 'सांस्कृतिक' सुस्ती !

सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचारप्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश कर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन झाले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या लिंबागणेश शाखेत पीककर्जासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना वैयक्तिक कर्जाची थकबाकी किंवा जामीनदाराच्या खात्यावरील थकीत देयकांमुळे अडचणी येत असल्याचा आरोप करण्यात आला.

संबंधित कर्जखाती नियमित केल्यानंतरच पुढील प्रक्रिया करता येईल, अशी भूमिका बँकेकडून घेतली जात असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. एकीकडे शासन दुष्काळ निवारणासाठी मदतीची घोषणा करत असताना दुसरीकडे बँकांच्या कर्जविषयक प्रक्रियेत शेतकऱ्यांची अडवणूक होत असेल, तर या घोषणांचा उपयोग काय, असा सवालही उपस्थित करण्यात आला. बँका, मायक्रोफायनान्स कंपन्या, फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांकडून होणाऱ्या सक्तीच्या कर्जवसुलीला आळा घालावा, तसेच नियमबाह्य वसुली करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

Beed News
Pankaja Munde : भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याला मी येतेय... तुम्हीही सुखरूप या

जामीनदार असलेल्या शेतकऱ्यांना अन्य कर्ज खात्यावर थकबाकीच्या कारणावरून पीककर्ज नाकारण्याबाबतचे अटींमध्ये आवश्यक शिथिलता द्यावी, पात्र शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि नेकनूर डीसीसी बँकेतील कथित अडवणूक थांबवावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, महसूलमंत्री, कृषिमंत्री आणि विभागीय आयुक्त यांना निवेदन पाठविण्यात आले.

या वेळी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे उपविभागीय व्यवस्थापक योगेश गुप्ता, वरिष्ठ व्यवस्थापक प्रवीण मुळे, लिंबागणेश शाखेचे व्यवस्थापक सोन्याबापू रासकर, पाटोदा शाखेचे व्यवस्थापक एस. बी. शिंदे, मंडळ अधिकारी उच्चला राऊत, ग्राममहसूल अधिकारी गणपत पोतदार तसेच पोलीस उपनिरीक्षक धायगुडे, पोलीस हवालदार नवनाथ मुंडे आणि तांबे यांच्या माध्यमातून निवेदन देण्याची प्रक्रिया पार पडली. या रास्ता रोको आंदोलनात सरपंच बालासाहेब जाधव, कल्याण बापू वाणी, बाळकृष्ण थोरात, शिवशक्ती-भीमशक्ती विचारमंचाचे प्रदेशाध्यक्ष बालासाहेब मोरे पाटील, शेतकरी हक्क मोर्चाचे संयोजक राजेंद्र आमटे,

इंटकचे बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले, अॅड. गणेश वाणी, विक्रांत वाणी, दामोदर थोरात, रमेश गायकवाड, अशोकराजे वाणी, शंकर वाणी, अंकुश गायकवाड, पप्पू आवसरे, सोनबा गिरे, विशाल येडे, कृष्णा वायभट, पोखरी चे सरपंच बिभीषण मुळीक, पिंपरनईचे सरपंच बालासाहेब वायभट, रेवण मोरे, मुळुकवाडीचे माजी सरपंच कृष्णा पितळे, संतोष भोसले, संजय घोलप, कामगार नेते सुनील भोसले, विवेक बागल आदी सहभागी झाले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यात येणारे अडथळे दूर करून सक्तीच्या कर्जवसुली बाबत च्या तक्रारींची दखल घ्यावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news