Beed News : शॉकग्रस्त मुलाच्या मृत्यू प्रकरणी दोन डॉक्टरांवर कारवाई

जिल्हा आरोग्य प्रशासनाने कठोर भूमिका घेत दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे.
Doctors
DoctorsPudhari
Published on
Updated on

Beed News: Action taken against two doctors over the death of a boy who suffered an electric shock

धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात विद्युत शॉक लागलेल्या १४ वर्षीय मुलाच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा आरोग्य प्रशासनाने कठोर भूमिका घेत दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे. प्राथमिक चौकशीत कर्तव्यात कसूर झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रामसिंग परदेशी आणि कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. परवेज शेख यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिले आहेत.

Doctors
Beed district hospital : माता, बाल रुग्णालय महिनाभरात कार्यान्वित होणार

मिळालेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास विद्युत शॉक लागलेला १४ वर्षीय मुलगा गंभीर अवस्थेत धारूर ग्रामीण रुग्णालयाच्या अपघात विभागात दाखल करण्यात आला होता. रुग्णावर तातडीने सीपीआर, ऑक्सिजन, आवश्यक औषधोपचार आणि ईसीजीच्या माध्यमातून उपचार करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी केज येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेनंतर मृत मुलाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. उपचार प्रक्रिया आणि डॉक्टरांच्या वर्तणुकीबाबत प्रश्न उपस्थित झाल्याने रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Doctors
बजाज हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मातेचा मृत्यू
धारूर ग्रामीण रुग्णालयातील घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कर्तव्यात काही त्रुटी आणि प्रशासकीय हलगर्जीपणा आढळून आल्याने त्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्यात आले आहे. रुग्णसेवा ही आरोग्य विभागाची सर्वोच्च जबाबदारी असून, त्यात कोणत्याही प्रकारची कसूर अथवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्या विरुद्ध नियमानुसार कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांनी रुग्णसेवेबाबत अधिक संवेदनशील, जबाबदार आणि तत्पर राहण्याची गरज आहे.
डॉ. सतीश कुमार साळुंके, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news