Beed Crime News : दारू पाजून चुलत भावाचा केला खून

एक तासात आरोपीच्या आवळल्या मुसक्या
Beed Murder News
Beed Crime News : दारू पाजून चुलत भावाचा केला खूनfile photo
Published on
Updated on

Beed News: A man murdered his cousin after giving him alcohol

केज : पुढारी वृत्तसेवा केज तालुक्यातील केज, पुढारी हनुमंत पिंपरी शिवारात चुलत भावाने चुलत भावाचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली. केज तालुक्यातील हनुमंत पिंपरी येथील विक्की उर्फ आण्णा रावसाहेब चंदनशिव वय (२५ वर्ष) या युवकाचा त्याचा सख्खा चुलत भाऊ महेश उत्तरेश्वर चंदनशिव याने धारदार हत्याराने गळा चिरून त्याचा खून केला आहे.

Beed Murder News
अंबाजोगाई येथे सर्वपक्षीय शोकसभा; श्रद्धांजली अर्पण

दि. ३० जानेवारी रोजी महेश त्रिंबक चंदनशिव याने त्याचा सख्खा चुलत भाऊ विक्की उर्फ आण्णा रावसाहेब चंदनशिव याला सोबत घेऊन हनुमंत पिंपरी येथील पारधी वस्तीवर दारू पाजली. त्या नंतर त्याला जेवण्याच्या निमित्ताने मोटार सायकल वरून केवड येथील धाब्यावर घेऊन गेला.

तिथेही त्याला भरपूर दारू पाजली. त्या नंतर त्याला मोटार सायकलवर बसवून घेऊन केवड आणि हनुमंत पिंपरी येथील शिवरस्त्यावर घेऊन आला. तिथे कोणी नसल्याने त्या निर्जनस्थळी घेऊन गेला. तिथे महेशने दारूच्या नशेत असलेल्या विक्की उर्फ आण्णा याला गाडीवरून उतरवून मारहाण केली आणि भाजी कापण्याच्या बतई सारख्या धारदार शस्त्राने त्याच्या गळ्यावर वार करून त्याचा खून केला.

Beed Murder News
रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानात घसघशीत वाढ

गळ्यावर वर्मी जखम झाली असल्याने अतिरक्तस्राव झाल्याने विक्की उर्फ आण्णा चंदनशिव याचा जागीच मृत्यू झालाअसावा. तो दारूच्या नशेत असल्याने त्याला प्रतिकार करता आला नसावा. असा प्राथमिक अंदाज आहे. त्या नंतर विक्की उर्फ आण्णा चंदशिव याचे प्रेत रस्त्यावर टाकून महेश घरी निघून गेला.

त्या नंतर दुसऱ्या दिवशी एका शेतकऱ्याने विकीचे प्रेत पहिल्या नंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गुप्ता पद्धतीने मारेकऱ्यांची माहिती काढली आणि अवघ्या एक तासात विक्की उर्फ आण्णा चंदनशिव यांचा मारेकरी त्याचा सख्खा चुलत भाऊ महेश त्रिंबक चंदनशिव याला ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news