Beed Peacock Poaching | मोराची शिकार करणारे चार जण ग्रामस्थांच्या तावडीत; मांस पिशवीत भरताना रंगेहाथ सापडले

नेकनुरजवळील मांडवखेल परिसरात घटना
Neknur villagers catch poachers
Neknur villagers catch poachersPudhari
Published on
Updated on

Neknur villagers catch poachers

नेकनुर : नेकनुरजवळील मांडवखेल परिसरातील डोंगर भागात वन्यप्राण्यांची शिकार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत मोराची शिकार करणाऱ्या चौघांना रंगेहात पकडले. या आरोपींना वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले असून मंगळवारी (दि.१९) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

मांडवखेल परिसरातील डोंगर भागात हरिण, ससा, मोर यांसारख्या वन्यप्राण्यांची शिकार केली जात असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. सोमवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास काही संशयित व्यक्ती शिकारीच्या उद्देशाने फिरत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.

Neknur villagers catch poachers
Beed Farmer Protest : हक्काच्या पाण्यासाठी 29 मे रोजी मोर्चा

ग्रामस्थांनी त्यांच्यावर लक्ष ठेवले असता त्यांनी एका मोराची शिकार करून त्याचे मांस पिशवीत घेऊन जात असल्याचे आढळून आले. यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ कारवाई करत चौघांना पकडले व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून आरोपी त्यांच्या ताब्यात दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news