Chain snatching Beed | बीड - नगर महामार्गावर चोरट्यांनी गंठण हिसकावले, महिला दुचाकीवरून पडून जखमी

शेरी पुलावरील घटनेने खळबळ
Beed Sheri Pul robbery
Beed Sheri Pul robbery(AI Photo)
Published on
Updated on

Beed Sheri Pul robbery

आष्टी : बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शेरी पुलावर दोन अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील १६ ग्रॅम सोन्याचे मिनी गंठण भरदिवसा ओरबडून नेले. या झटापटीत महिला स्कुटीवरून पडल्याने नातीसह जखमी झाली.

नेमकी घटना काय?

आष्टी तालुक्यातील केरूळ येथील एक महिला आपल्या नातीला कडा येथील दवाखान्यात दाखवण्यासाठी स्कुटीवरून आली होती. उपचार घेऊन त्या गावाकडे जात असताना, शेरी पुलावर मागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीवरील दोन अज्ञातांनी महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण ओरबडले. चोरट्यांच्या या ओढाताढीत महिलेचे स्कुटीवरील नियंत्रण सुटले आणि त्या नातीसह खाली पडल्या. यात त्यांना दुखापत झाली.

Beed Sheri Pul robbery
Beed Crime news | मुरुम माफियांची दादागिरी ! तहसीलदारांनी जप्त केलेले टिप्पर तहसील आवारातूनच पळवले

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न

चोरट्यांनी दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केल्यानंतर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गेल्या आठवडाभरात अंभोरा आणि आष्टी परिसरात अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. भरदिवसा घडणाऱ्या या लूटमारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस हवालदार भाऊसाहेब आहेर या प्रकरणाचा तपास करत आहेत, मात्र वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे "पोलीस या चोरट्यांचा शोध कधी घेणार ?" असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news