Beed Milk Adulteration : दूध भेसळीच्या ‘व्हे पावडर’ रॅकेटचा पर्दाफाश! फरार दोन्ही आरोपी अखेर जेरबंद!

१,८०० किलो संशयित व्हे पावडर जप्त प्रकरण, मुख्य आरोपींसह दोघेही पोलिसांच्या जाळ्यात
Milk
Milk AdulterationPudhari
Published on
Updated on

कडा : भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हे पावडरची अवैध वाहतूक व विक्रीप्रकरणी आष्टी पोलिसांनी यापूर्वी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आष्टी येथील दिलीप जानदेव हंबर्डे याचे नाव समोर आल्यानंतर आष्टी पोलिसांनी त्याला सोमवारी रात्री अटक केली.

या कारवाईमुळे भेसळयुक्त दूध तयार करण्याच्या साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.दुधामध्ये भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या संशयित व्हे पावडरच्या अवैध वाहतूक व पुरवठा प्रकरणात अखेर पोलिसांना मोठे यश आले आहे. कारवाईनंतर फरार झालेल्या आरोपींचा शोध घेत असताना दोन्ही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून, या कारवाईमुळे भेसळीच्या संभाव्य रॅकेटबाबत खळबळ उडाली आहे.

आष्टी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे संशयित पिकअप वाहनावर कारवाई करत एकूण ७२ गोण्या,तब्बल १,८०० किलो व्हे पावडर जप्त केली होती. या मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख ६९ हजार ७०० रुपये असल्याचे पोलिसांच्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमान्वये आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Milk
Beed News : माजलगाव धरणाची उंची वाढवण्यास २२ पुनर्वसित गावांतील शेतकऱ्यांचा विरोध!

️पहिला आरोपी अटकेत; आता दोघांनाही बेड्या!

या प्रकरणातील यशवंत उर्फ सुशांत उर्फ बाबू लक्ष्मण गोपालघरे याला पोलिसांनी यापूर्वी अटक करून न्यायालयीन प्रक्रियेसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर फरार असलेल्या कैलास जनार्दन हंबर्डे व दिलीप जानदेव हंबर्डे यालाही पोलिसांनी ३१ ऑगस्ट रोजी अटक केली.त्यामुळे या प्रकरणातील फरार आरोपींना पकडण्यात आष्टी पोलिसांना यश आले आहे.

दुधात भेसळ करण्यासाठीच होता पावडरचा साठा? तपासातून होणार खुलासा

तब्बल १,८०० किलो व्हे पावडरचा साठा नेमका कुठून आणला होता? तो कोणाला पुरवला जाणार होता? दुधात भेसळ करण्यासाठी त्याचा वापर होणार होता का? या मागे आणखी कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता पोलिस तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.

तिन्ही आरोपींमुळे तपासाला नवे वळण

या प्रकरणातील यशवंत सुशांत उर्फ बाबू लक्ष्मण गोपालघरे, कैलास जनार्दन हंबर्डे आणि दिलीप जानदेव हंबर्डे या तिन्ही आरोपींच्या सहभागामुळे व्हे पावडरची अवैध वाहतूक नेमकी कुठून सुरू होती, ती कोणाला पुरवली जाणार होती आणि या प्रकरणामागे आणखी कोण आहे, याचा आता पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद भुतेकर करीत आहेत.

फरार आरोपी जेरबंद

व्हे पावडर जप्ती प्रकरणात फरार असलेले सर्व आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. तब्बल १,८०० किलो संशयित पावडर जप्त झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. आता आरोपी जेरबंद झाल्याने या प्रकरणा मागील संपूर्ण साखळी उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news