

Massajog Farmers Motor Wire Theft
केज : केज तालुक्यातील मस्साजोग येथील स्व. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यासह गावातील सहा ठिकाणी घरफोडी आणि ४० ते ४२ शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याच्या मोटारीचे वायर चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
दि. ९ एप्रिल रोजी रात्री केज तालुक्यातील मस्साजोग येथील स्व. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह अच्युत पंढरी देशमुख, श्रीधर भीमराव देशमुख, नितीन मंकचराव देशमुख, बाळासाहेब बाबासाहेब देशमुख, भागवत विष्णू सोळुंके यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चोरीचा प्रयत्न केला. यात पंढरी देशमुख यांच्या घरातील १० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३० हजार रु. ची चोरी झाली आहे. तसेच श्रीधर देशमुख यांच्या घरातील रोख ६० हजार रु., श्रीधर सोळंके यांच्या घरातील गंठण, लॉकेट, माळ, झुंबर व पोत असे एकूण तीन तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने चोरीला गेले आहे.
तसेच मस्साजोग येथील ४० ते ४२ शेतकरी यांच्या पाण्याच्या मोटारीचे वायर चोरीला गेले आहेत. त्यात अंगद गायकवाड, स्वरूपानंद देशमुख, महादेव गायकवाड, लक्ष्मण घाटूळ, उद्धव देशमुख, अशोक घाटूळ, बाबासाहेब घाटूळ, आबासाहेब नागिशे, बालासाहेब गायकवाड, परमेश्वर गायकवाड, सखाराम गायकवाड, किरण गायकवाड, अनिकेत देशमुख, सुशांत गायकवाड, बापू शिंदे, अक्षय गायकवाड, दयानंद गायकवाड, संतोष देशमुख अंकुश गायकवाड
लिंबराज गायकवाड, महादेव जाधव, आप्पासाहेब गायकवाड, राजाभाऊ गायकवाड, सुभाष गायकवाड, हनुमंत गायकवाड, प्रकाश गायकवाड, बालासाहेब देशमुख, श्रीमंत गायकवाड, बळीराम गायकवाड, उद्धव गायकवाड, राम कदम, आकाश गायकवाड, संजीवन देशमुख, सुरज देशमुख, गणेश देशमुख बाळासाहेब गायकवाड, विष्णू गायकवाड, जालिंदर गायकवाड, संजीवन गायकवाड, रामदास गायकवाड अशा सुमारे ४० ते ४२ शेतकऱ्यांचे वायर चोरीला गेले आहेत. अद्याप या चोरी आणि घरफोडी प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.
चोरीची घटना माहित होताच सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम, पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण, राजू वंजारे यांनी भेट देऊन चोरांचा माग काढण्याचा तपास सुरू केला आहे.