Beed Tractor Accident |माजलगावात ट्रॅक्टर पलटी होऊन शेतमजूर तरुणाचा मृत्यू

माजलगाव तालुक्यातील हिवरा (बु.) येथे पहाटे अपघातात
Farm Laborer Death Beed
गणेश गाडेPudhari
Published on
Updated on

Farm Laborer Death Beed

माजलगाव : माजलगाव तालुक्यातील हिवरा (बु.) येथे ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात २८ वर्षीय शेतमजूर तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.१२) पहाटे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणेश भारत गाडे (वय २८, रा. हिवरा बु., ता. माजलगाव) हे शेतमजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गुरुवारी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास ते शेतातील कामासाठी ट्रॅक्टर घेऊन जात असताना शेतातील वळण रस्त्यावर ट्रॅक्टर वळविताना वाहनाचा तोल जाऊन ट्रॅक्टर पलटी झाले. या अपघातात ट्रॅक्टर त्यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Farm Laborer Death Beed
Beed HSC exam copying case | बीडच्या चौसाळा परीक्षा केंद्रातील कॉपी प्रकरणी प्रशासनाची मोठी कारवाई

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले; मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेमुळे हिवरा (बु.) गावात शोककळा पसरली आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या तरुणाच्या अचानक निधनामुळे गाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news