Missing Students Majalgaon | सिंधफणा स्कूलच्या हॉस्टेलमधून तीन विद्यार्थी बेपत्ता; माजलगावात खळबळ

वसतिगृह प्रशासन व पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
Majalgaon Sindphana School Hostel Missing Students
Majalgaon Sindphana School Hostel Missing StudentsPudhari
Published on: 
Updated on: 

Majalgaon Sindphana School Hostel Missing Students

माजलगाव : माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथील सिंधफणा पब्लिक स्कूलच्या वसतिगृहातून दहावीतील तीन विद्यार्थी रात्रीच्या जेवणानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पालकांसह शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी वसतिगृह प्रशासन व पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

बेपत्ता विद्यार्थ्यांमध्ये दिनेश विठ्ठल चव्हाण (वय १६, रा. चंद्रमांतांडा, नित्रुड, ता. माजलगाव), तेजस संतोष चव्हाण (वय १५, रा. कोळवाडी हनुमान, ता. परतूर, जि. जालना) आणि अभिजीत श्रीनिवास राठोड (वय १५, रा. भोकर नगर, पाथरी, जि. परभणी) यांचा समावेश आहे.

Majalgaon Sindphana School Hostel Missing Students
Beed News : हिवरापहाडी शाळेतील चिमुकल्यांच्या 'बॉटल माईक' रिपोर्टिंगची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून दखल!

वसतिगृहातील विद्यार्थ्यांची रात्रीच्या जेवणानंतर उपस्थिती तपासण्यात आली असता हे तिन्ही विद्यार्थी त्यांच्या ठिकाणी नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर व्यवस्थापनाने वसतिगृह परिसर तसेच आसपासच्या भागात शोधमोहीम सुरू केली. पालकांकडूनही विद्यार्थ्यांचा तातडीने शोध घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, वसतिगृहातील सीसीटीव्ही फुटेज, विद्यार्थ्यांची ये-जा, रजिस्टरमधील नोंदी तसेच इतर सुरक्षाव्यवस्थेची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथकांची मदत घेतल्याची माहिती आहे.

Majalgaon Sindphana School Hostel Missing Students
Beed News : धारूर घाटात लोखंडी ऐवजी सिमेंटचे कठडे उभारण्याची गरज

वसतिगृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

तीन अल्पवयीन विद्यार्थी वसतिगृहातून नेमके कोणत्या मार्गाने बाहेर पडले, त्यावेळी सुरक्षा कर्मचारी तैनात होते का? सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत होते का? आणि प्रवेश-निर्गमनाची नोंद झाली का? याबाबत तपासातून स्पष्टता येणे अपेक्षित आहे.

विद्यार्थ्यांचा लवकरात लवकर शोध लागावा आणि घटनेमागील नेमके कारण स्पष्ट व्हावे, यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news