Beed Boy Drowns | सावरगाव शिवारातील धरणात बुडून सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू

परिसरात हळहळ; मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असताना घडली दुर्दैवी घटना
Majalgaon Savargaon Dam Boy Death
माजलगाव तालुक्यातील सावरगाव शिवारातील धरणात बुडून मुलाचा मृत्यू झाला Pudhari
Published on
Updated on

Majalgaon Savargaon Dam Boy Death

माजलगाव : तालुक्यातील सावरगाव शिवारातील धरणात बुडून आदित्य उत्तमराव रंजवे या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य उत्तमराव रंजवे हा कुटुंबातील मोठा मुलगा होता. त्याचे वडील सावरगाव शिवारातील शेतात शेतमजूर म्हणून काम करत होते. दरम्यान, आदित्य हा आपल्या काही मित्रांसोबत धरणात पोहण्यासाठी गेला होता. उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक युवक धरण व कालव्यांमध्ये पोहण्यासाठी जातात. त्याचप्रमाणे आदित्यही मित्रांसोबत धरण परिसरात गेला होता.

Majalgaon Savargaon Dam Boy Death
Beed Crime | केज तालुक्यात नात्याला काळीमा; आजोळी आलेल्या १३ वर्षीय मुलीवर चुलत मामेभावाकडून तोंड, हात बांधून अत्याचार

धरण परिसरात काही ठिकाणी माती उपसा व गाळ काढण्याच्या कामामुळे खोल खड्डे निर्माण झाले असल्याची माहिती समोर येत आहे. पोहत असताना आदित्यचा अंदाज चुकल्याने तो खोल पाण्यात गेला आणि बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही वेळानंतर तो दिसेनासा झाल्याने मित्रांमध्ये घबराट पसरली.

दरम्यान, शेतातील मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. काही वेळाने आदित्यचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Majalgaon Savargaon Dam Boy Death
Beed Crime : 60 वर्षांच्या आजोबाने, चुलत भावाने नात्याला फासला काळीमा, 15 वर्षांच्या मुलीची आपबिती ऐकून सगळेच सून्न

या दुर्दैवी घटनेमुळे रंजवे कुटुंबावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. अल्पवयातच आदित्यचा मृत्यू झाल्याने मित्रपरिवार व नातेवाईकांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news