llegal Sand Beed | अवैध वाळू वाहतुकीविरोधात माजलगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३०.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत सुमारे ३० लाख रुपये किंमतीचा टिप्पर आणि ३० हजार रुपये किंमतीची पाच ब्रास वाळू जप्त करण्यात आली
Illegal Sand Mining Case Majalgaon
Illegal Sand Mining Case MajalgaonPudhari
Published on
Updated on

Illegal Sand Mining Case Majalgaon

माजलगाव : अवैध वाळू वाहतुकीविरोधात माजलगाव ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे ३० लाख रुपये किमतीचा टिप्पर आणि ३० हजार रुपये किमतीची पाच ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून, संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रबोरगाव–आबेगाव मार्गावर पहाटेच्या सुमारास अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती माजलगाव ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक विजय रामोड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे सुमारे ४.३० वाजता घटनास्थळी सापळा रचण्यात आला.

Illegal Sand Mining Case Majalgaon
Beed Crime | माजलगाव तालुक्यातील तालखेड मध्ये जावयाचा खून?

काही वेळातच संशयित टिप्पर तेथून येताना दिसताच पोलिसांनी वाहन अडवून त्याची सखोल तपासणी केली. तपासणीदरम्यान टिप्परमध्ये विनापरवाना वाळूची वाहतूक सुरू असल्याचे तसेच वाहनाच्या इंजिन व चेसी क्रमांकामध्ये खाडाखोड करण्यात आल्याचे उघड झाले. चालकाकडे वाळू वाहतुकीसाठी आवश्यक असलेली कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी टिप्परसह वाळू जप्त करून संबंधित चालकाला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर प्रभावी आळा घालण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि शासनाच्या महसुलाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी अशा प्रकारच्या धडक कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news