माजलगाव : नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी 29 ऑगस्ट पासून राज्यस्तरीय संप पुकारण्यात आला आहे. या संपाला माजलगाव नगर परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपला पाठिंबा देत आजपासून (दि.4) नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत संप सुरू करून कार्यालयातच ठिय्या मांडला आहे.
शासन दरबारी नगरपरिषद अधिकाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत.त्यात प्रामुख्याने जुनी पेंशन योजना लागू करणे. सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळणे. पदोन्न्तीच्या कोटयातील रिक्त पदे तात्काळ भरणे. मुख्याधिकारी विभागीय स्पर्धा परिक्षा तात्काळ MPSC मार्फत घेणे. वेतन शासन लेखा कोषागार खात्यामार्फत करण्यात यावे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांची वाढीव पदे निर्माण करणे. ब वर्गनगर परिषद येथे उपमुख्याधिकारी हे पद निर्माण करणे.
राज्य संवर्गामध्ये 25% जागा स्थानिक कर्मचारी यांना सेवा जेष्ठतेने भरण्यात येणे. कर व प्रशासकीय सेवा यांची वेतन श्रेणी S-13 करणे.या मागण्यांचा समावेश आहे.परंतु, शासन याबाबत ठोस निर्णय घेत नसल्याने राज्यात नगरपरिषद अधिकारी कर्मचाऱ्यांनी 31 ऑगस्ट रोजी बेमुदत संप पुकारला आहे. या संपला माजलगाव नगर परिषद अधिकारी कर्मचारी यांनी पाठिंबा दर्शवत संप सुरू करून नगरपरिषद कार्यालयातच ठिय्या मांडला आहे.
या आंदोलनात जगदीश जाधवर,शिवहर शेटे, मारुती गित्ते,अक्षय धारक, दडके, वाजेद अली,इलियास देशमुख, भिसे बाबासाहेब,शेख अख्तर, सखाराम होके,आर.के.ईके,शिंदे पी.यु.,जोशी व्ही एच,सय्यद शकीला,विमल मोरे,लताबाई साठे,छायाबाई दहिवाळ,करडे एम.एच.राठोड एस एन,मधुमती करडे मिराबाई रांजवण यांचा सहभागी होते.